“मौलाना आझाद” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“मौलाना आझाद” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

‘मौलाना लागल्यावर त्यांनी अबुल कलाम आझाद असं टोपणनाव घेतलं. पुढं सारं जग त्यांना त्याच नावानं ओळखू लागलं. त्यांच्या प्रकांड विद्वत्तेमुळं लोक त्यांना आदरानं मौलाना म्हणत.

आझादांच्या वडलांचं नाव खैरुद्दीन. ते मूळचे दिल्लीचे. काही वर्षं त्यांचं वास्तव्य मक्का इथं होतं. मक्केला त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव अलिया. या दांपत्याच्या पोटी ११ नोव्हेंबर १८८८ रोजी अबुल कलाम आझाद यांचा जन्म झाला. आझाद दोन वर्षांचे असताना हे कुटुंब मक्केहून भारतात परत आलं.

आझादांना बालपणात प्राथमिक शिक्षणाचे धडे आईवडलांकडूनच मिळाले. personal introduction vyaktiparichayवडलांनी त्यांना घरच्याघरी शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. शिक्षकानं एखादा धडा शिकवला, की तो पक्का लक्षात ठेवायचा. एकदा धडा वाचून झाला, की तो पुस्तकात न पाहता जसाच्या तसा तोंडपाठ म्हणून दाखवायचा, हा आझादांचा परिपाठ होता.

तीक्ष्ण बुद्धी व तीव्र स्मरणशक्ती यांमुळं त्यांनी वयाच्या सोळा वर्षापर्यंत अरबी, फारसी आणि उर्दू या तिन्ही भाषांमध्ये प्रावीण्य संपादन केलं. तसंच इस्लाम धर्म, साहित्य, तत्त्वज्ञान,

गणित इत्यादी विषय आत्मसात केले; परंतु इंग्रजी भाषा शिकल्याशिवाय आपणांस आधुनिक ज्ञान प्राप्त होणार नाही, याची जाणीव त्यांना झाली. आझादांनी इंग्रजी भाषा अवगत करून घेतली. त्यांचा वाचनाचा छंद दांडगा होता. त्यांनी लहान वयातच इतिहास, धर्मशास्त्र, साहित्य इत्यादी विषयांवरील अनेक पुस्तकं वाचून काढली होती. त्यामुळे त्यांच्यावर बुद्धिवादी आणि उदारमतवादी विचारांचा सखोल प्रभाव पडला होता. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ‘लिसानुस्सिक’ नावाचं विचारप्रवर्तक मासिक काढलं होतं.

तरुण वयातच आझादांनी अनेक देशांचा प्रवास केला. तेथील लोकांच्या चालीरीती, राजकारण यांचा बारकाईनं अभ्यास केला. जगातल्या स्वतंत्र राष्ट्रांनी कशी प्रगती केली आहे, ते त्यांनी पाहिलं. भारत जर स्वतंत्र झाला, तर त्याचीही अशीच प्रगती होईल, या कल्पनेनं ते भारावले.

भारतात परतल्यावर आझादांनी ‘अल् हिलाल’ personal introduction vyaktiparichayनावाचं एक उर्दू साप्ताहिक सुरू केलं. आपल्या जळजळीत लेखांमधून त्यांनी परक्या ब्रिटिश सरकारवर टीकेची झोड उठवली आणि उत्कट राष्ट्रवादी विचारांचं मोहोळ उठवलं. देशबांधवांना स्वातंत्र्यचळवळीत सामील होण्याचं आवाहन केलं.

१९१४ मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं. आझादांनी ‘अल् हिलाल’मधून युद्धाला व इंग्रजांना युद्धात मदत करण्याच्या कल्पनेला विरोध केला. ब्रिटिश सरकार खवळून गेलं. सरकारनं ‘अल् हिलाल’वर बंदी घातली; पण आझाद असल्या बंदीनं खचणारे नव्हते. त्यांनी लगेच ‘अल् बलाग़’ या नावाचं दुसरं साप्ताहिक सुरू केलं आणि आपलं कार्य चालूच ठेवलं. सरकारनं ‘अल् बलाग़ ‘वरही बंदी आणली. एवढंच नाही, तर आझादांना रांची इथं नजरकैदेत ठेवलं.

चार वर्षांच्या नजरकैदेतून आझाद जेव्हा सुटले, तेव्हा देशातलं वातावरण पार बदललं होतं. इंग्रज सरकारनं युद्धकाळात दिलेल्या सुधारणेच्या आश्वासनाला हरताळ फासला होता. इतकंच नाही, तर ‘रौलट कायदा’ हा काळा कायदा देशात जारी केला होता. पंजाबात जालियनवाला बागेत शेकडो निरपराध लोकांची क्रूर कत्तल केली होती. देशाच्या कोनाकोपऱ्यांत ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाची लाट उसळत होती.

याच सुमारास भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींचा उदय झाला होता. ब्रिटिश सरकारच्या जुलूमशाहीविरुद्ध त्यांनी असहकाराचं आणि सत्याग्रहाचं अमोघ शस्त्र उपसलं होतं. हजारो भारतीय गांधीजींच्या असहकार चळवळीत सामील झाले होते. त्यांनी आपले व्यवसायही सोडले होते. साऱ्या देशात आंदोलनाचे वादळी वारे वाहत होते. आझादांनी स्वतःला या वादळात झोकून दिलं. देशभर फिरून लोकजागृती केली. सरकारनं आझादांना पुन्हा तुरुंगात टाकलं.

personal introduction vyaktiparichayहिंदू-मुसलमान यांच्यातील एकजूट आणि राष्ट्रभावना यांनी इंग्रज सरकार बेचैन झालं. ही ऐक्यभावना आपल्या साम्राज्याला सुरुंग लावणार, याची त्यांना खात्री होती. म्हणून ‘फोडा आणि राज्य करा’ या कुटिल नीतीचा त्यांनी वापर केला. काही पुढाऱ्यांना आमिष दाखवून राष्ट्रीय आंदोलनापासून दूर केलं. आझादांसारख्या नेत्यांनी केलेलं राष्ट्रीय एकात्मतेचं काम मोइन काडण्याचा जोरदार प्रयत्न केला.

आझादांनी आपल्या आयुष्याचं ध्येय राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता हे निश्चित केलं होतं. असहकार आंदोलन आणि खिलाफत चळवळ यांच्या ते अग्रभागी राहिले निश्चित कारावासही भोगावा लागला.

१९२३ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आझादांची निवड करण्यात आली. त्या वेळी ते अवघे ३५ वर्षांचे होते. अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठं स्फूर्तिदायक भाषण केलं. ते म्हणालकको ‘हिंदुस्थानातील हिंदू आणि मुसलमान जर एकमेकांपासून अलग झाले, तर या देशाचंच नव्हे तर सबंध मानवतेचं नुकसान होईल.’

राष्ट्रीय एकता संमेलनांमधून त्यांनी हिंदू-मुसलमानांची एकजूट बळकट करण्याचं कार्य नेटानं केलं.

१९४० साली आझाद दुसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९४०-४६ या निर्वाणीच्या काळात ते सतत ६ वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या काँग्रेस अधिवेशनात ‘चले जाव’ चळवळ सुरू करण्याचा ठराव त्यांच्याच अध्यक्षतेखाली पास झाला. त्यानंतर सुमारे तीन वर्ष आझादांना अहमदनगरच्या किल्ल्यात स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं होतं.

१९४५ मध्ये सरकारनं काँग्रेसच्या सर्व नेत्यांची सुटका केली. ब्रिटिश सरकारच्च्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या वाटाघाटींत, राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हणून आझादांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय नेते आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यातील या वाटाघाटींमधून भारतीय स्वातंत्र्य कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.

मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. शिक्षणमंत्री या नात्यानं आझादांनी मोलाची कामगिरी पार पाडली. त्यांनी ‘युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन’ नेमले. ‘माध्यमिक शिक्षण आयोग’ नेमला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिक्षण हे राष्ट्र उभारणी आणि राष्ट्रीय विकास यांसाठी महत्त्वाचं साधन असल्यानं स्वतंत्र भारताच्या सरकारनं त्याकडं पुरेसं लक्ष दिलं पाहिजे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समावेश अभ्यासक्रमात झाला पाहिजे, असं आझादांचं ठाम मत होते.

मौलाना आझाद हे विख्यात साहित्यिक होते. त्यांनी विपुल लेखन केलं आहे. ‘तर्जुमान- उल्-कुरआन’ हे कुरआन शरीफवरील भाष्य. ‘इंडिया विन्स फ्रीडम’ आणि अहमदनगरच्या किल्ल्यात लिहिलेलं ‘गुबार-इ-खातीर’ ही त्यांची गाजलेली पुस्तकं होत.

स्वातंत्र्याच्या आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या या महान उपासकाचं २२ फेब्रुवारी १९५८ रोजी निधन झालं. भारताच्या संमिश्र संस्कृतीचं एक चालतंबोलतं प्रतीक काळाच्या पडद्याआड गेलं.