“पंडित जवाहरलाल नेहरू” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
भारतातल्या जनतेनं पंडित जवाहरलाल नेहरूंवर अपार प्रेम केलं. स्वतः पंडितजींना त्याची पूर्ण जाणीव होती. ते म्हणत,
‘मी भारतावर अलोट प्रेम केलं आणि जनतेनं त्या प्रेमाची पुरेपूर परतफेड केली.’
पंडितजी लोकजीवनाशी एकरूप झाले होते. लोकांची दुःखं, हाल-अपेष्टा त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या.
पंडितजींचं व्यक्तिमत्त्व विलक्षण समृद्ध होतं. समाजाच्या कुठल्याही घटकामध्ये ते सहजतेनं वावरत. लहान मुलांत वावरताना ते लहानाहून लहान होत असत. त्यांच्याशी खेळणं, गोष्टी सांगणं याची त्यांना भारी हौस ! personal introduction vyaktiparichayमुलांचंही त्यांच्यावर फार प्रेम. सारी मुलं त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणत. मुलांवर त्यांची भिस्त फार. ही मुलं म्हणजे उद्याच्या भारताचे नागरिक आहेत. या देशाची प्रगती, विकास त्यांच्याच हातात आहे, याची त्यांना जाणीव होती. ते म्हणत,
‘मुलं हा राष्ट्राचा अमोल ठेवा आहे, तो प्राणपणानं जपला पाहिजे.’
पंडितजींच्या मनात अंधश्रद्धेला मुळीच थारा नव्हता. कोणतीही गोष्ट, कुणीतरी सांगतो, म्हणून स्वीकारण्याऐवजी ते तिची शहानिशा करायचे, प्रत्येक अनुभव बुद्धीच्या कसोटीवर तपासायचे आणि नंतर स्वीकारायचे. विवेकशील आणि क्रांतिकारी विचारांमुळं ते तरुणांचे लाडके आणि स्फूर्तिदायी नेते झाले. समाजात आमूलाग्र बदल करण्याची शक्ती तरुणांतच आहे, याची त्यांना पूर्ण जाण होती. ही युवाशक्ती राष्ट्रकार्याला लावण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. संवेदनाक्षम असणारे पंडितजी विचारानं आणि बुद्धीनं परिपक्व होते. त्यांची सहृदयता आणि करुणा मातेसारखी होती.
personal introduction vyaktiparichayपंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे एका संपन्न आणि समृद्ध कुटुंबात झाला. त्यांच्या आईचं नाव स्वरूपराणी. वडील मोतीलाल नेहरू हे एक विख्यात कायदेपंडित होते. पुढं मोतीलालजी आणि स्वरूपराणी यांनी स्वातंत्र्यलढ्यात हिरिरीनं भाग घेतला.
पंडितजी लाडाकोडात वाढले. त्यांचं सगळं प्राथमिक शिक्षण घरीच झालं. पुढं इंग्लंडमधील ‘हॅरो’च्या प्रसिद्ध शाळेत ते गेले. तेथून केंब्रिज या जगद्विख्यात विद्यापीठातून त्यांनी शास्त्र या विषयात पदवी मिळवली. वकिलीची परीक्षा दिली. बॅरिस्टर होऊन ते १९१२ साली भारतात परतले. काही काळ अलाहाबादच्या न्यायालयात त्यांनी वकिली केली; परंतु वकिलीत त्यांचं मन रमेना. देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं, अशी त्यांना तळमळ होती, पण त्या काळात देशात जे अर्ज-विनंत्यांचं मवाळ राजकारण सुरू होतं, त्यातही पंडितजींचं मन रमलं नाही. personal introduction vyaktiparichayहोमरूलच्या आंदोलनानं मात्र त्यांना राजकारणात खेचलं. त्यांनी होमरूल लीगमध्ये प्रवेश केला. ते तिचे सचिव झाले.
या सुमारास सरकारनं रौलट कायदा पास केला. या राक्षसी कायद्याविरुद्ध सर्व देशभर आंदोलनं सुरू झाली.
महात्मा गांधींनी रौलट कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू केलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळं जवाहरलाल त्यांच्याकडं ओढले जाऊ लागले. पंडितजींच्या आयुष्यातल्या क्रांतिकारी परिवर्तनाला अशी सुरुवात झाली.
या काळात पंडितजींनी ग्रामीण भागाचा दौरा केला. भारतातला शेतकरी कसा राहतो, कसा जगतो, काय विचार करतो, याचा त्यांनी जवळून अभ्यास केला. आतापर्यंत दारिद्र्य ही त्यांच्यासाठी केवळ एक कल्पना होती. आता दारिद्र्याचं त्यांना प्रत्यक्ष दर्शन झालं. खरा भारत खेड्यातच आहे आणि तो अर्धनग्न, अर्धपोटी आणि खंगलेला आहे, याची त्यांना जाणीव झाली. या शेतकऱ्यांचं जीवन जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत देशात शांती आणि समृद्धी येणार नाही; आणि जर हे व्हायचं असेल, तर प्रथम देश स्वतंत्र झाला पाहिजे, असं त्यांचं ठाम मत झालं.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी गांधीजींचा शांततामय, अहिंसात्मक प्रतिकाराचा मार्ग ही सुसंस्कृत तक्याची पद्धत आहे, असं त्यांना मनोमन वाटलं. १९२१ च्या असहकार स पंडितजींनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षा झाली.
जवाहरलालांनी असहकार personal introduction vyaktiparichayआंदोलनात भाग घेतला, या घटनेला भारतीय स्वातंत्र्यसंग्रामान एक विशेष महत्त्व आहे. त्यांच्यासमवेत भारतीय तरुणांची एक संपूर्ण पिढी या संग्रामात उतरला नव्या कल्पना, नवा उत्साह आणि नवी कार्यपद्धती यांचं जवाहरलाल प्रतीक होते. त्यांच्या पिढीला भारावून टाकणाऱ्या कल्पनांचे ते पाईक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं लोण तरुणांपर्यंत पोहोचलं होतं, याचं ते गमक होतं.
१९२७ मध्ये ब्रुसेल्स येथे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यांच्या विरोधी एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. भारतीय राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून पंडितजी या परिषदेला हजर राहिले. तेथून त्यांनी रशियाला भेट दिली.
बुसेल्सच्या परिषदेत आणि रशियाच्या भेटीत त्यांना दोन गोष्टींची जाणीव झाली. एक म्हणजे, भारतीय स्वातंत्र्यसंग्राम हा जागतिक संदर्भ लक्षात घेऊन लढवला गेला पाहिजे. केवळ भारताचं स्वातंत्र्य एवढंच मर्यादित उद्दिष्ट न ठेवता आशिया आणि आफ्रिका खंडांतील सर्व परतंत्र देशांचं स्वातंत्र्य हे ध्येय भारतानं समोर ठेवलं पाहिजे. भारताचा लढा हा पारतंत्र्याविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांना प्रेरक ठरला पाहिजे. भारतात परत आल्यावर हा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन त्यांनी सतत काँग्रेसपुढं मांडला आणि भारतीय राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीय दृष्टी दिली.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारतीय स्वातंत्र्यलढा हा केवळ राजकीय स्वातंत्र्याचा लढा असून भागणार नाही, याविषयी त्यांच्या मनात शंका राहिली नाही. त्यांच्या असं लक्षात आलं होतं, की भारतातल्या गरिबांचं शोषण फक्त इंग्रज राज्यकर्तेच करतात, असं नाही. आपल्या देशातले जमीनदार, सरंजामदार, भांडवलदार हेसुद्धा गरिबांना सतत लुबाडतात. या सर्व शक्तींचा समूळ नाश झाला पाहिजे, हे त्यांचं मत रशियाच्या भेटीमुळं जास्त बळकट झालं.
आर्थिक समतेशिवाय personal introduction vyaktiparichayसामाजिक समता येणार नाही. समाजातील दैन्य केवळ राजकीय घोषणा देऊन दूर होणार नाही, तर त्यासाठी जनजागृती आणि जनआंदोलन उभं केलं पाहिजे, असं त्यांचं मत झालं.
जुन्या नेतृत्वाची, वसाहतीच्या स्वराज्याची कल्पना नव्या पिढीला मान्य नव्हती. १९२९ ला लाहोर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते. लाहोर काँग्रेसमध्ये जवाहरलाल, सुभाषचंद्र बोस अशा तरुणांनी संपूर्ण स्वातंत्र्याच्या कल्पनेचा आग्रह
धरला. लाहोर काँग्रेसच्या ठरावानुसार संपूर्ण स्वातंत्र्य हे भारताच्या राष्ट्रीय सभेचं अंतिम उद्दिए बनलं. २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन म्हणून भारतभर साजरा करावा, असा आदेश कग्रेिसनं लोकांना दिला आणि ३१ डिसेंबर १९२९ च्या मध्यरात्री रावी नदीच्या तीरावर पंडितजींनी भारतीय आकांक्षांचं प्रतीक असणारा चरखांकित तिरंगा मोठ्या समारंभपूर्वक फडकावला. स्वातंत्र्याच्या उगवणाऱ्या पहाटेची ती नांदी होती.
१९३१ ते १९३८ हा त्यांच्या आयुष्यातला अत्यंत कठीण काळ होता. त्यांचे वडील मोतीलाल, पत्नी कमला आणि आई स्वरूपराणी यांच्या निधनांचे आघात त्यांच्यावर झाले होते. जानेवारी १९३२ ते सप्टेंबर १९३५ या कालावधीत एकूण १०७० दिवस पंडितजींनी तुरुंगवासात काढले होते. तुरुंगवासातच त्यांनी जगप्रसिद्ध आत्मचरित्र (अॅन ऑटोबायॉग्रफी) लिहिलं.
१९३९ मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. हुकुमशाही शक्ती विरुद्ध लोकशाही शक्ती असं या युद्धाचं स्वरूप होतं. पंडितजींची लोकशाहीवर नितांत श्रद्धा होती. हुकुमशाहीचा जय झाला, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यालाही धक्का पोहोचेल, असं त्यांचं मत होतं, म्हणूनच या युद्धात भारतानं लोकशाही राष्ट्रांना पाठिंबा दयावा, असं त्यांना वाटत होतं.
परंतु त्यांना हेही पटत होतं, की गुलामगिरीत असणाऱ्या भारताच्या पाठिंब्याला काही अर्थ नाही. स्वतः लोकशाही राष्ट्र म्हणवणाऱ्या इंग्लंडचा साम्राज्यवाद तितकाच प्रखर होता, म्हणजे आता या लढ्याचं सगळं स्वरूपच बदललेलं होतं. एकीकडं हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा होता; तर दुसरीकडं साम्राज्यवाद विरुद्ध स्वातंत्र्य असा. यामध्ये गांधीजींना स्वातंत्र्य हे जास्त मूलभूत आहे, असं वाटत होतं. ब्रिटिशांचा साम्राज्यवादही हुकुमशाहीइतकाच भयंकर होता. त्याच्याशी संघर्ष करणं तितकंच महत्त्वाचं होतं. गांधीजींनी हे स्पष्ट केलं होतं, की इंग्लंडला जर युद्धामध्ये भारतीयांची मदत हवी असेल, तर ती स्वतंत्र भारताकडूनच मिळू शकेल. पंडितजींना महात्माजींचं म्हणणं पटलं आणि त्यांनी गांधीजींच्या ‘चले जाव’ ठरावाला पूर्णपणं पाठिंबा दिला.
बेचाळीसच्या personal introduction vyaktiparichayपहिल्या धरपकडीतच पंडितजींना अटक झाली. त्यांची रवानगी अहमदनगरच्या तुरुंगात करण्यात आली. पुढं जून १९४५ मध्ये बंदिवासातून त्यांची सुटका झाली.
युद्धानंतर इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेवर आला. भारतीयांना स्वातंत्र्य देण्याविषयी या पक्षाचं मत अनुकूल होतं. त्यांनी भारतीय नेत्यांशी वाटाघाटींना सुरुवात केली. भारतीयांच्या हाती सत्ता सोपवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली.
सप्टेंबर १९४६ मध्ये पंडितजींच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्यात आलं.
परंतु मुस्लिम लीगचा विरोध वाढतच होता. त्यांची स्वतंत्र पाकिस्तानची मागणी जोर
धरत होती. हा प्रश्न सोडवल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य देण्यास इंज तयार नव्हते. अखेर काँग्रेसनं भारताच्या फाळणीला मान्यता
१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री सगळं जग झोपलेलं असताना, भारताच्या स्वातंत्र्याचा उदय झाला. स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाची सूत्रे हाती घातल्या त्यांच्याच शब्दांत सांगायचं म्हणजे, अनेक वर्षांपूर्वी भारतानं नियतीशी केलेल्या कराराची, पूर्णपणे नाही, तरी अंशतः सांगता होत होती.’
१९४७ ते १९६४ इतका प्रदीर्घ काळ पंडितजी भारताचे पंतप्रधान होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सामान्य माणसाच्या लढ्याचं स्वरूप देणारे महात्माजी आता हयात नव्हते. त्यांच्या स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला पंडितजींनी समाजवादाची जोड दिली होती. आता ती स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्याचा काळ आला होता.
भारताचं भयावह दारिद्र्य, प्रचंड प्रमाणातील निरक्षरता, अन्नधान्याची टंचाई, औद्योगिक परावलंबन, फाळणीतून उद्भवलेले प्रश्न अशा असंख्य भीषण समस्या भेडसावत होत्या. नेहरूंनी त्यांना खंबीरपणं तोंड दिलं. त्यांनी पंचवार्षिक योजनांतून स्वावलंबी औद्योगिक विकासाची प्रक्रिया सुरू केली. देशवासीयांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा परोपरीनं प्रयत्न केला. शांतता व अलिप्तता या तत्त्वांच्या आधारे देशाच्या परराष्ट्र धोरणाची पक्की पायाभरणी केली. या राष्ट्राला सर्वार्थानं आधुनिक करण्याचा पाया घातला.
personal introduction vyaktiparichayनेहरू हे विज्ञानाचे उपासक होते. विकासाचं साधन म्हणून विज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, याची त्यांना जाणीव होती. वैज्ञानिक प्रगतीचा हेतू देशातील गोरगरिबांच्या प्रश्नांची सोडवणूक, हाच असला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता. वैज्ञानिक संशोधनासाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था स्थापन केल्या.
भारताचं स्वातंत्र्य, समृद्धी व प्रगती या ध्येयांसाठी उभी हयात व्यतीत करणारे नेहरू हे खरंतर मानवतेचे महान उपासक होते. जागतिक शांततेसाठी ते आयुष्यभर झटले. शांतिदूत म्हणून सारं जग त्यांना ओळखतं.
भारतीय परंपरेविषयीचा पंडितजींचा आदर आणि अभिमान डोळस होता. पंडितजींचं मन कवीचं मन होतं. लोकांचं दारिद्र्य पाहून ते मन कळवळलं. अज्ञान पाहून हळहळलं. तसंच वा देशाची सांस्कृतिक संपन्नता व अप्रतिम सौंदर्य पाहून ते भारावून गेलं होतं. भारताच्या इतिहासावर त्यांचं नितांत प्रेम होतं. इतिहास म्हणजे मानवानं सतत संघर्षातून केलेल्या प्रगतीची गाथा आहे, अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या ‘दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ (भारताचा शोध) आणि ‘ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ (जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन) या पुस्तकांत त्यांच्या मनाचे हे सारे पैलू आपल्याला स्वच्छ दिसतात.
शतकानुशतकाच्या अज्ञानातून आणि दारिद्र्यातून देशाला वर काढण्याचं व्रत घेतलेल्या पंडितजींना विश्रांती कुठली ! देशाचा, जगाचा भार ते वाहत होते. कधीतरी त्यांचं संवेदनाक्षम कविमन बेचैन होत असे. कविता हा त्यांचा विरंगुळा होता.
आधुनिक भारताच्या या शिल्पकाराचा personal introduction vyaktiparichayराष्ट्रपतींनी ‘भारतरत्न’ हा किताब देऊन गौरव केला.
नियतीशी केलेल्या कराराच्या परिपूर्तीची वाटचाल करत असतानाच २७ मे १९६४ रोजी पंडितजी कालवश झाले.
एक चिरतरुण ज्वलंत काव्य अनंतात विलीन झालं.