“अमृता खानविलकर” व्यक्तीविशेष/भाषण/निबंध personal introduction vyaktivishesh

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“अमृता खानविलकर” व्यक्तीविशेष/भाषण/निबंध personal introduction vyaktivishesh

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर (जन्म २३नोव्हेंबर इ.स. १९८४ मध्ये पुणे येथे झाला. नाव राजू तर आईच नाव गौरी खानविलकर आहे. ही मराठी अभिनेत्री असून तिने मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिने मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.

अमृता खानवलकर ही मूळची मुंबई आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कुलात झाले. प्रमुख चित्रपटः गोलमाल; साडे माडे तीन. अमृता खानविलकर हिची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४ मधील “झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज” या गुणवत्ता- शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील “अदा” या मालिकेत तिला भूमिका मिळाली. तिने झी म्युझिक वाहिनीवरील “बॉलिवुड टुनाइट” या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील “कॉमेडी एक्सप्रेस” (इ.स. २०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या पहिल्या कालखंडात तिने सुमारे साडेतीनशे भागांमध्ये संचालनाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर काही काळाच्या विरामानंतर जुलै इ.स. २०१२मध्ये तिने “कॉमेडी एक्सप्रेस” कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी पुनरागमन केले.