“लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

वल्लभभाईंचं संपूर्ण नाव होतं वल्लभभाई जव्हेरभाई पटेल, आईचं नाव लाडबाई. ते राहत होते गुजरात राज्यातल्या पेटलाद तालुक्यातील करमसद गावी. याच गावी ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी वल्लभभाईंचा जन्म झाला.

वल्लभभाईंचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल हे मोठे पुढारी होते. ते एक कुशल संसदपटू

होते.

वडिलांनी वल्लभभाईंना मॅट्रिकपर्यंत शिकवलं.personal introduction vyaktiparichay कॉलेजचा खर्च पेलणं त्यांना शक्य नव्हतं. वल्लभभाईंना तर बॅरिस्टर होण्याची इच्छा होती. त्यांनी मुखत्यारीची परीक्षा दिली आणि गोधरा इथं वकिली सुरू केली. गोधऱ्याहून ते नंतर बोरसदला गेले. तिथं त्यांची वकिली

खूपच जोरात चालली. पुढं वल्लभभाई बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडला गेले. तिथल्या वास्तव्यात ते फार काटकसरीनं आणि अत्यंत साधेपणानं राहत असत. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून ग्रंथालय बऱ्याच अंतरावर होतं. वल्लभभाई रोज सकाळी लवकर उठून पायी चालत ग्रंथालयात जायचे आणि दिवसभर अध्ययन करत बसायचे. त्यात ते इतके गढून जायचे, की त्यांना वेळेचं भानही उरायचं नाही. इतके कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केल्यामुळंच ते प्रथम क्रमांकानं परीक्षा पास झाले. त्यांना पन्नास पौंडांचा पुरस्कारही मिळाला.

बॅरिस्टर होऊन भारतात personal introduction vyaktiparichayपरतल्यावर त्यांनी अहमदाबाद शहरात वकिली सुरू केली. अल्पावधीतच त्यांनी एक कुशल कायदेपंडित म्हणून नावलौकिक मिळवला.

याच सुमारास गांधीजी दक्षिण आफ्रिकेहून परतले होते आणि स्वराज्यासाठी जनजागृतीच्या आणि संघटनेच्या कामाला लागले होते. गांधीजींचं नाव आणि काम वल्लभभाईंच्या कानी पोचलं होतं. गांधीजींच्या आचार-विचारानं ते भारावून गेले. त्यांनी वकिलीवर पाणी सोडलं. थाटामाटाची राहणी सोडून खादीचे जाडेभरडे कपडे ते वापरू लागले. गांधीजींचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि देशाच्या स्वातंत्र्याकरिता ते झटू लागले.

गोधरा शहरात गांधीजींच्या अध्यक्षतेखाली गुजरात सभेचं संमेलन भरलं होतं. वल्लभभाई सभेचे सचिव होते. त्यांनी गुजरातमधील शेतकऱ्यांकडून अवाजवी कर घेण्याच्या सरकारी धोरणाविरुद्ध ठराव मांडला. लढा दिला. शेवटी सरकारला नमतं घेणं भाग पडलं.

वल्लभभाई अहमदाबादच्याpersonal introduction vyaktiparichay सार्वजनिक जीवनात भाग घेऊ लागले. पुढं ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष बनले. खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सत्याग्रह आणि नागपूरचा झेंडा सत्याग्रह यांत त्यांनी भाग घेतला. तसेच मजूर महाजन संघ व गुजरात विद्यापीठ अशा संस्थांमधून त्यांनी पुढाकार घेऊन प्रभावी काम केलं.

१९२८ साली झालेल्या बारडोलीच्या सत्याग्रहामुळं तर ते भारतात विख्यात झाले. सरकारनं शेतकऱ्यांवर शेतसारा वाढवून जुलूम चालवला होता. या जुलमाविरुद्ध वल्लभभाईंनी आवाज उठवला. सरकारनं दडपशाही सुरू केली. वल्लभभाईंनी निर्भयपणानं शेतकऱ्यांना संघटित केलं आणि सत्याग्रहाचं रणशिंग फुंकलं. सरकारी सारा कोणीही भरायचा नाही, असं फर्मान वल्लभभाईंनी काढलं. शेतकऱ्यांनी त्यांचा शब्द मानला. त्यांना चांगली साथ दिली. सरकारनं जाहीर केलेल्या मुदतीपर्यंत शेतकऱ्यांकडून एक पैदेखील खजिन्यात जमा झाली नाही. सरकारनं गरीब शेतकऱ्यांचा छळ सुरू केला. गरीब शेतकऱ्यांची घरं, झोपड्या, भांडीकुंडी, गुरं यांचा लिलाव सुरू केला; पण सरकारविरुद्ध वल्लभभाईनी लोकांच्या मनात एवढा असंतोष निर्माण केला होता, की त्या लिलावात बोली बोलायला कोणीही पुढं आला नाही.

सरकार आणखीनच personal introduction vyaktiparichayभडकून उठलं. दडपशाहीचा वरवंटा जोरात फिरू लागला. शेतकऱ्यांच्या चळवळीलादेखील अधिक धार येऊ लागली. सगळ्या देशाचे डोळे बारडोलीकडं लागले. देशाच्या कोनाकोपऱ्यांतून सत्याग्रही स्वयंसेवकांचे जथे बारडोलीला येऊन थडकले सरकारनं वाटाघाटींसाठी वल्लभभाईंना निमंत्रित केलं आणि अखेरीस शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं मान तुकवली, बारडोलीचा सत्याग्रह यशस्वी झाला. गांधीजींना आनंद झाला. त्यांनी या यशाबद्दल वल्लभभाईंना ‘सरदार’ अशी पदवी बहाल केली. भारतीय जनता तेव्हापासून वल्लभभाईंना ‘सरदार’ म्हणूनच ओळखू लागली.

१९३१ साली कराची येथे काँग्रेसचं अधिवेशन भरलं. सरदार पटेल या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कायदेभंगाचं आंदोलन स्थगित झाल्यामुळं लोक अस्वस्थ झाले होते. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या फाशीमुळं या अस्वस्थतेत भर पडली होती. या परिस्थितीत आपल्या संघटन- कौशल्यानं वल्लभभाईंनी कराची काँग्रेस यशस्वी केली.

वल्लभभाई संघटनाकुशल होते. काँग्रेसच्या कारभारावर त्यांची पकड होती. काँग्रेसनं ज्या ज्या वेळी निवडणुका लढवल्या, त्या त्या वेळी सगळी सूत्रं वल्लभभाई हालवत असत.

‘चले जाव’ चळवळीत काँग्रेसच्या इतर नेत्यांबरोबर वल्लभभाईंनाही पकडण्यात आलं. त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवलं होतं.

१९४५ साली त्यांची सुटका झाली. त्या वेळी ते म्हणाले होते,

‘चले जाव’ ठरावातील एक अक्षरही आम्ही बदललेलं नाही. आता तर आम्ही ब्रिटिशांना आशियातूनही ‘चले जाव’ म्हणतो !’

भारत स्वतंत्र झाला. personal introduction vyaktiparichayपं. नेहरू पंतप्रधान झाले आणि सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री झाले. स्वतंत्र भारतापुढं अनेक अवघड प्रश्न उभे होते. त्यांतच देशातील संस्थानिकांचाही प्रश्न होता, पण वल्लभभाईनी तो मोठ्या कौशल्यानं सोडवला. संस्थानिकांशी वाटाघाटी करून त्यांना आपली संस्थानं भारतात विलीन करण्यास भाग पाडलं; परंतु जुनागड, हैदराबाद व काश्मीर येथील संस्थानिकांनी मात्र विलीनीकरणास विरोध केला. तेव्हा जुनागड संस्थानातील प्रजेनं तेथील नबाबाविरुद्ध उठाव केला. नवाब पाकिस्तानात पळून गेला आणि जुनागड भारतात विलीन झालं. हैदराबादच्या निजामानं रझाकारांना हाताशी धरून बंडच उभारलं होतं. भारत सरकारला नाइलाजानं पोलीस कारवाई करावी लागली आणि हैदराबादचंही विलीनीकरण झालं. काश्मीर संस्थानाचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते. काश्मीर पाकिस्तानात सामील करण्यासाठी १९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने

सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. यामुळे हरिसिंगाने भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले. लष्कराने काश्मीरचा मोठा भाग घुसखोरांच्या हातून परत मिळवला. अशा रीतीनं वल्लभभाईनी सर्व संस्थानांचं विलीनीकरण करून भारत एकसंध केला. त्यांच्या या खंबीरपणामुळं आणि कर्तृत्वामुळं त्यांना भारताचे ‘पोलादी पुरुष’ म्हटलं जातं.

वल्लभभाई पंचाहत्तर वर्षांचे झाले होते. त्यांची प्रकृती वारंवार बिघडू लागली होती. तरीही ते भारताच्या गृहखात्याची धुरा personal introduction vyaktiparichayकणखरपणानं वाहत होते, पण आजार बळावला आणि १५ डिसेंबर १९५० रोजी मुंबईत त्यांचं दुःखद निधन झालं.

पंडित नेहरू म्हणाले,

‘माझा बंधुतुल्य स्नेही, भारताचा खंबीर सेनापती आणि श्रेष्ठ भाग्यविधाता आपल्याला सोडून गेला !’