“लोकमान्य बाळ गंगाधर टिळक” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
लोकमान्य टिळक
आपलं सारं आयुष्य देशकार्याला वाहणाऱ्या देशभक्तांमध्ये लोकमान्य बाळ गंगाबर टिळक हे अग्रणी होते. त्यांच्या आधीच्या पिढीत देशकार्याचं व लोकसेवेचं व्रत उभं आयुष्य सर्वस्वी त्यासाठी खर्च करणारी माणसं विरळाच होती. टिळक म्हणाले होते, घेऊन
‘देशाच्या निकृष्ट अवस्थेच्या विचारानं माथी भडकलेले आम्ही तरुण आहोत.’
टिळकांच्या जहाल विचारांमुळं इंग्रज सरकारच्या दरबारी ते ‘राजमान्य’ कधीच झाले नाहीत; परंतु लोकांच्या दरबारी मात्र ते ‘लोकमान्य’ झाले.
अखिल भारताला हेलावून सोडणाऱ्या या लोकोत्तर पुरुषाचा जन्म रत्नागिरी येथे २३ जुलै १८५६ रोजी झाला. वडील गंगाधरपंत हे संस्कृत पंडित आणि गणित विषयाचे तज्ज्ञ होते. त्यांच्या विद्वत्तेचा टिळकांवर खोल परिणाम झाला. संस्कृत आणि गणित या दोन्ही विषयांवर पुढे त्यांनी प्रभुत्व मिळवलं.
मॅट्रिक पास झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी टिळक पुण्याच्या डेक्कन कॉलेजात दाखल झाले.
टिळक पुण्याला आले, तेव्हा किरकोळ शरीरयष्टीचे होते. कॉलेजातले त्यांचे मित्र त्यावरून त्यांची चेष्टाही करत. टिळकांनाही सुदृढ प्रकृतीचं महत्त्व पटलं. मग वर्षभर त्यांनी अभ्यास बाजूला ठेवला, भरपूर व्यायाम केला. शरीर वज्रासारखं केलं. या दणकट शरीरप्रकृतीमुळे पुढं त्यांनी अनेक शारीरिक कष्टांना हसत हसत तोंड दिलं.
या काळातले त्यांचे जवळचे मित्र म्हणजे गोपाळ गणेश आगरकर, दोघंही बुद्धिमान, चारित्र्यसंपन्न आणि विचारी. दोघंही खूप वाचत. त्यावर चर्चा करत. दोघांच्याही बुद्धीला विलक्षण धार. दोघांनाही एकच प्रश्न बेचैन करत असे. आमच्या देशाचा इतिहास इतका संपन्न, आमची संस्कृती इतकी महान, मग आज आम्ही परकीयांचे गुलाम का, आमचा समाज मागे का, भारताला या निकृष्ट अवस्थेतून बाहेर कसं काढता येईल ?
या प्रश्नाचं दोघांनाही उत्तर मिळालं, ते एकच होतं. आपल्या लोकांचं अज्ञान दूर केल्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणार नाही. त्यासाठी लोकांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचा प्रभाव पाडला पाहिजे, त्यांना जागं केलं पाहिजे, लोकजागृतीच्या कार्यासाठी आपलं सारं आयुष्य खर्च करण्याचा त्यांनी निश्चय केला.
अशाच विचारानं भारलेल्या एका व्यक्तीशी टिळक-आगरकर यांची भेट झाली. ती व्यक्ती म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर. विष्णुशास्त्री चिपळूणकर जबरदस्त ताकदीचे लेखक होते. ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणून ते ओळखले जातात. जसं त्यांचं भाषेवर प्रभुत्व, तसंच या देशावर निस्सीम प्रेम. भारतीयांचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी त्यांनी ठणकावून सांगितलं,
‘आमच्या देशाला काही झालेलं नाही आणि त्याची नाडी अगदी साफ आहे !’
त्यांना इंग्रजांची सत्ता मुळीच मान्य नव्हती. पाश्चात्त्य विद्येबद्दल मात्र आदर होता. त्या विदयेतील वैज्ञानिक दृष्टी, तंत्रज्ञान, स्वातंत्र्य इत्यादी विचारांनी ते प्रभावित झाले होते.
या मंडळींनी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ सुरू केलं आणि पुढं फर्गसन कॉलेज काढलं. टिळकांच्या समाजकार्यास अशी सुरुवात झाली.
शिक्षणसंस्थेप्रमाणंच लोकशिक्षणाचं दुसरं प्रभावी साधन म्हणजे वर्तमानपत्र, टिळक- आगरकरांनी मराठी भाषेत ‘केसरी’ आणि इंग्रजी भाषेत ‘मराठा’ अशी दोन वर्तमानपत्रं सुरू केली.
वर्तमानपत्र ही ‘बृहत्तर जिव्हा’ म्हणजे विशाल जीभ आहे, हे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं मत टिळक-आगरकरांना पडत होतं. या जिभेनं आपण लोकांची गादाशी चव्हाट्यावर मांडली पाहिजेत, असं त्यांना वाटे. त्याचप्रमार्ण लोकांना विचाराच्या नग्या दिशा दाखवल्या पाहिजेत, असंही ते मानत. दोघंही पट्टीचे लिहिणारे. अनेक विषयांवर त्यांचं लिखाण चाले. जिथं अन्याय, भ्रष्टाचार दिसेल, तिर्थ ते जबरदस्त प्रहार करत.
याच अन्यायाच्या चिडेपोटी टिळकांनी कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. बर्वे कोर्टात गेले. कोर्टानं टिळक-आगरकरांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवलं. दोघांना एकशे एक दिवसांचा तुरुंगवास झाला. लोककार्यासाठी तुरुंगात जाणारे टिळक-आगरकर हे पहिले संपादक होते.
टिळक-आगरकर सुटून आले, तेव्हा आम जनतेनं त्यांचा सत्कार केला. महात्मा जोतीराव फुले यांनी त्यांचं कौतुक केलं.
यानंतरच्या काळात राजकीय क्षेत्रातलं टिळकांचं कार्य सतत वाढतच गेलं, तरी शिक्षकी पेशाची त्यांना असलेली ओढ अखेरपर्यंत कायम होती.
एकदा कोणीतरी त्यांना विचारलं,
‘समजा, या क्षणी स्वातंत्र्य मिळालं, तर तुम्ही काय कराल ?’
टिळक तत्काळ म्हणाले,
‘पुन्हा शाळेत जाऊन गणित शिकवीन !’
टिळकांनी ‘केसरी’तून लोकांची राजकीय जागृती करण्याचा चंग बांधला. लोकांना संघटित करणं, संघटितपणं विचार करायला शिकवणं हे राजकीय जागृतीचं पहिलं पाऊल. त्यासाठी टिळकांनी ‘शिवजयंती’, ‘गणेशोत्सव’ हे दोन सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची प्रथा सुरू केली. एकीकडं ‘केसरी’ च्या गर्जना आणि दुसऱ्या बाजूनं या उत्सवांतील देशभक्तिपर व्याख्यानं, राष्ट्रप्रेमाची गाणी यांनी समाज खडबडून जागा होऊ लागला. एका नव्या युगाचं वारं वाहू लागलं.
१९ व्या शतकाच्या अखेरीस दुष्काळ आणि प्लेग या आपत्तींनी महाराष्ट्रात हाहाकार उडवला होता. लोकांना धीर देणं, त्यांना योग्य दिशा दाखवणं याची आवश्यकता होती.
दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारनं काही नियम तयार केले होते. या नियमावलीला ‘फेमिन कोड’ असं म्हणत. इंग्रज अधिकारी या नियमांना धाब्यावर बसवत, मुष्काळातही सारावसुली करत. गरीब, अज्ञानी जनता अशी नागवली जात असे. टिळकांनी केभिन कोड’ चं मराठी भाषांतर करून छापलं. त्याच्या प्रती गावोगाव वाटल्या. दुष्काळग्रस्त भागात दौरे केले. शेतकऱ्यांना सांगितलं,
‘राज्य कायद्याचं आहे, अधिकाऱ्यांची दंडेली चालणार नाही. निर्भय बना, सरकारी अधिकाऱ्यांच्या अरेरावीला घाबरू नका.’
लोक निर्भय बनले. सरकारी अधिकाऱ्यांचा दबदबा कमी झाला.
दुष्काळाप्रमाणंच प्लेगनंही महाराष्ट्रात थैमान घातलं होतं. हजारो लोक मृत्युमुखी पडत होते. सरकारी व्यवस्था अपुरी होती आणि सरकारी नोकरशाही बेपर्वा होती. टिळकांनी गावोगाव जाऊन रोग्यांच्या छावण्यांची पाहणी केली. सरकारला सूचना केल्या. लोकांनी आधुनिक वैदयकीय ज्ञानाचा फायदा घ्यावा, असा सल्ला दिला. पुण्यातही प्लेगनं कहर माजवला. खुळ्या समजुतींमुळं लोक रोगी दडवून ठेवत. सरकारनं याविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी रेंड नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. रँडचे अधिकारी आणि शिपाई घराघरांत शिरून रोगी शोधत. हे करत असताना त्यांनी लोकांचे रीतिरिवाज, धर्मकल्पना यांचा विचारच केला नाही. परिणाम व्हायचा तोच झाला. लोक संतापले. जुलूमशाहीनं संतापलेल्या चाफेकर बंधूंनी गोळ्या घालून रँडची हत्या केली.
सरकार बिथरलं. धरपकड सुरू केली. आधीच लोक प्लेगनं बेजार होते. त्यात सरकारी छळाची भर पडली. टिळकांनी रँडच्या वधाचा निषेध केला, त्याचबरोबर सरकारी अत्याचारांचाही धिक्कार केला. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?’ असा स्पष्ट सवाल त्यांनी ‘केसरी’च्या अग्रलेखातून विचारला.
आधीच बिथरलेल्या सरकारनं टिळकांवर खटला भरला. टिळकांना दीड वर्षाची सक्तमजुरीची सजा झाली. सारा भारत हादरला आणि संतापलाही. लोकांच्या मनांतील सरकारची आणि तुरुंगाची भीती कमी झाली.
पुढच्या काळात तर तुरुंग हे भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचं जणू पवित्र स्थान झालं. स्वार्थत्यागाच्या एका महान परंपरेला सुरुवात झाली.
वाढत्या राष्ट्रवादाला आळा घालण्यासाठी १९०५ साली इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. सारा बंगाल संतापून उठला. ‘वंदे मातरम्’च्या गजरानं आसमंत दणाणला. बंगालवर अन्याय, म्हणजे भारतावर अन्याय, असं टिळकांनी सांगितलं. या अन्यायाविरुद्ध सगळ्या
भारतीयांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे, अन्यायी सरकारविरुद्ध लढा दिला पाहिजे, जात संश टिळकांनी दिला.
लढ्याला सूत्रबद्धता यावी, म्हणून स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय तिखाण असा चतुःसूत्री कार्यक्रम आखला. ठायीठायी परदेशी मालाच्या होळ्या झाल्या, लोकांनी स्वदेशी माल वापरण्याच्या आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या शपथा घेतल्या गावोगावी राष्ट्रीय शाळा उघडण्यात आल्या. साऱ्या देशभर असंतोषाचा डोंब उसळला.
या असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेच आहेत, याविषयी सरकारत्ना खात्री होती, म्हणून सरकारनं टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. १९०८ साली टिळकांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. टिळक म्हणाले,
‘कदाचित नियतीचीच अशी इच्छा असेल, की मला शिक्षा व्हावी आणि माझ्या हालअपेष्टांतून माझ्या कार्याला शक्ती लाभावी !’
सरकारनं टिळकांना म्यानमारमध्ये मंडाले इथं तुरुंगात ठेवलं. मंडालेचा तुरुंग भयंकर होता. हवा रोगट. दुपारी उष्णता इतकी, की जिवाचं पाणीपाणी व्हावं.
पण एखादया योग्याप्रमाणं टिळक अविचल होते. आपल्या सहा वर्षांच्या बंदिवासात त्यांनी ‘गीतारहस्य’ हा भगवद्गीतेवरचा विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिला. भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांनी दिलेल्या ‘चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा’, या संदेशाचा तात्त्विक पाया टिळकांनी स्पष्ट केला.
१९१४ साली टिळक मंडालेहून सुटून परत आले. साऱ्या देशाला आनंद झाला. त्यांच्या तुरुंगवासाच्या काळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक मरगळ आली होती.
टिळकांच्या सुटकेमुळं ही मरगळ दूर झाली. देशात उत्साहाचं वारं पुन्हा खेळू लागलं.
टिळक पुन्हा कामाला लागले. त्यांनी अॅनी बेझंट यांच्याबरोबर होमरूल चळवळ सुरू केली. होमरूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार आपण स्वतःच पाहणं होमरूलचा प्रसार करण्यासाठी टिळक गावोगाव हिंडले. – स्वराज्य.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी स्फूर्तिदायी घोषणा त्यांनी केली.
भारतीय स्वातंत्र्यसंग्राम ही कोण्या एका जातिधर्माची किंवा वर्गाची मिरास नाही, असं टिळकांचं मत होतं. त्यांना सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाला. या संग्रामात हिंदू-मुस्लिमांची एकजूट चळकट व्हावी, या दृष्टीनं १९९६ साली त्यांनी एक करार घडवून आणला. तो ‘लखनऊ करार’ हणून ओळखला जातो.
कामकरी वर्गाविषयी टिळकांना विशेष आस्था होती. त्यांना संघटित केलं पाहिजे, कारण श्री एक प्रचंड शक्ती आहे, याची त्यांना जाणीव होती. आयटक या कामगार संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
भारतीयांनी कूपमंडूक वृत्तीनं राहू नये, साऱ्या जगातील घडामोडींची दखल घ्यावी, असं लोकमान्यांना वाटत असे, म्हणून ‘केसरी’ व ‘मराठा’तून अशा विषयांवर ते लेखन करत.
रशियामध्ये १९१७ साली झालेल्या क्रांतीविषयी त्यांना विलक्षण उत्सुकता होती. त्यांनी ‘केसरी’मध्ये या क्रांतीवर एक लेखमाला प्रसिद्ध केली.
टिळकांचा कामाचा उरक जबर होता. त्यांचं कार्यक्षेत्र केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांचं व्यक्तिमत्त्व अनेक दिशांनी फुललेलं होतं. एक विवेकनिष्ठ, विचारी तत्त्वज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती होती. ‘गीतारहस्या’ प्रमाणंच त्यांनी ‘ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम इन दि वेदाज’ हे विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले. गणित आणि खगोलशास्त्र यांच्या मदतीनं त्यांनी एक शास्त्रशुद्ध पंचांग तयार केलं.
आयुष्यभरातील देशकार्याच्या धकाधकीनं टिळक थकले होते, तरीही धडपड चालूच होती.
अखेर हा पहाडासारखा माणूस आजारी पडला. १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईला त्यांचं देहावसान झालं. एक प्रलयकारी झंझावात शांत झाला.