“डॉ.राजेंद्र प्रसाद” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“डॉ.राजेंद्र प्रसाद” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

बाब या गुणांमुळंच ते अजातशत्रू म्हणून ओळखले जात. त्यांच्याविषयी गांधीजींनी म्हटलं आहे, ‘राजेंद्रबाबूंचा त्याग ही आमच्या गौरवाची निशाणी आहे. नेतृत्व करण्यासाठी त्यांच्यासारखं चारित्र्य हवं. आचरण हवं. त्यांच्याएवढा विनम्रपणा मी कधीच पाहिला नाही,”

राजेंद्रबाबूंचा जन्म ३ डिसेंबर १८८४ रोजी विहारमधील जीरादेई या लहानशा खेड्यात झाला. ग्रामीण वातावरणातच त्यांचं बालपण गेलं. त्यामुळं ग्रामीण जीवनाचा प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला. मॅट्रिकच्या परीक्षेत ते सर्वप्रथम आले. पुढं कोलकत्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बी. ए. व एम. ए. च्या पदव्या त्यांनी प्रथम क्रमांकाने मिळवल्या. काही दिवस प्राध्यापकाची नोकरी केल्यानंतर त्यांनी कायदयाची सर्वोच्च पदवीदेखील प्रथम क्रमांकानं मिळवली.

विद्यार्थिदशेतच राजेंद्रबाबूंनी स्वदेशीचं व लोकसेवेचं व्रत अंगीकारलं होतं. राजेंद्रबाबूंनी विद्यार्थ्यांना एकत्र करून १९०८ साली ‘बिहार छात्र परिषद’ नावाची संघटना स्थापन केली. राजकीय जागृती करणारी ही विद्यार्थी संघटना होती. १९११ पासून त्यांनी कोलकता येथे

वकिलीचा व्यवसाय सुरू केला. या वर्षीच ते काँग्रेसचे सदस्य झाले. यानंतर १९१६ पासून राजेंद्रबाबूंनी पाटणा येथील उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. तिथं आपल्या असामान्य बुद्धिमत्तेनं व सौजन्यानं त्यांनी सर्वत्र नावलौकिक मिळवला.

याच वर्षी लखनऊ इथं भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांचा महात्मा गांधीजीशो जवळून संबंध आला. तिथं राजकुमार शुक्ल यांनी चंपारण्य येथील शेतकरी व शेतमजूर यांच्या हलाखीची करुण कहाणी गांधीजींच्या पुढं मांडली होती. त्यांना चंपारण्याला भेट देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणं गांधीजी चंपारण्यात गेले. राजेंद्रबाबूही त्यांच्याबरोबर गेले. त्यांनी तेथील परिस्थिती पाहिली. तेथील मोठमोठे मळे गोऱ्या लोकांच्या मालकीचे होते. ते शेतकऱ्यांना आपली जमीन कसायला देत. शेतकऱ्यांकडून जबरदस्त खंड वसूल करत. शिवाय प्रत्येक शेतकऱ्याला निळीची लागवड करण्यास भाग पाडत. निळीच्या लागवडीस नकार दिल्यास शेतकऱ्यांवर अनन्वित अत्याचार करत. शेतकऱ्यांच्या गा-हाण्यांची कोठेही दखल घेतली जात नसे. महात्मा गांधींनी राजेंद्रबाबू, राजकुमार शुक्ल, व्रजकिशोरबाबू, अवंतिकाबाई गोखले यांच्यासारख्या सहकाऱ्यांसमवेत चंपारण्यात वर्षभर सत्याग्रह केला. हा गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह होता. या सत्याग्रहानं शेतकऱ्यांची गा-हाणी दूर झाली. या यशस्वी सत्याग्रहात राजेंद्रबाबू गांधीजींचे निकटचे सहकारी बनले.

सन १९१८ मध्ये गांधीजींसमवेत राजेंद्रबाबू गुजरातेतील खेडा जिल्ह्यात गेले. तिथं त्यांनी शेतकऱ्यांच्या साराबंदीच्या चळवळीत भाग घेतला. त्यासाठी रणरणत्या उन्हात ते गांधीजींसमवेत जिल्हाभर फिरले. हाही सत्याग्रह यशस्वी झाला. सरकारनं वाढवलेला शेतसारा

कमी केला.

जालियनवाला बागेत घडलेल्या हत्याकांडाची हकीगत कळताच राजेंद्रबाबूंनी प्रतिज्ञा केली,

‘मी यापुढं वकिली करणार नाही. सर्व वेळ देशकार्याला वाहून घेईन.’

त्याप्रमाणं राजेंद्रबाबूंनी यापुढील काळात गांधीजींनी पुकारलेल्या स्वातंत्र्याच्या सर्व आंदोलनांमध्ये अग्रेसर राहून भाग घेतला आणि वेळोवेळी कारावास भोगला.

राजेंद्रबाबूंना विधायक कामात अधिक रस होता. बिहार प्रांतात खादी, ग्रामोद्योग, अस्पृश्यता निवारण, राष्ट्रभाषा प्रचार, तसेच राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार या कार्याला ते जोमानं लागले. त्या काळात बिहारमध्ये त्यांनी शिक्षण प्रसाराचं जणू एक मोठं जाळंच विणलं. त्यांनी अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळा, तसंच महाविद्यालयही सुरू केलं. पुढे त्यांनी १९२१ साली बिहार विद्यापीठ स्थापन केलं. या विद्यापीठासाठी गांधीजींनी पन्नास हजार रुपये निधी राजेंद्रप्रसादांच्या स्वाधीन केला. तसंच राजेंद्रबाबूंचे जिवलग मित्र मडारुल हक् यांनी आपला प्रशस्त बंगला आणि भोवतालची जमीन राजेंद्रबाबूंना देणगी म्हणून दिली.

बानी तिथे एक आश्रम स्थापन करून त्याचं नाव ठेवलं. ‘सदाकत आश्रम’ इयंच त्यांनी आपल्या राजकीय हालचालींचं आणि विधायक कार्याचं केंद्र निर्माण कल भी

राजेंद्रबाबू हाडाचे मानवतावादी होते. गोरगरिबांवर कोठलीही आपत्ती कोसळली, की त्यांच्या मदतीला धावून जायचं, हा त्यांचा स्वभाव होता. १९२४ मध्ये विहारमधील महापुराच्या संकटकाळी, १९३४ मध्ये बिहार भूकंपाच्या वेळी, तसंच १९३५ मधील क्वेट्टा स्वाल भूकंपाच्या वेळी राजेंद्रबाबूंनी जिवाचं रान केलं आणि आप‌ग्रस्तांना मोलाचं साहच केलं. बिहार भूकंपग्रस्तांसाठी तर शेकडो मैल पदयात्रा करून त्यांनी जवळपास अड़तीस लाख रुपयांचा निधी उभारला. यावरून राजेंद्रबाबूंची लोकप्रियता आणि कर्तबगारी दिसून येते.

१९३५ साली त्यांची मुंबईच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली. त्यांनी देशभर दौरा करून काँग्रेस संघटनेमध्ये चैतन्य आणलं. राजेंद्रबाबू आता देशाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. राजेंद्रबाबू हे सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे आणि सर्वांचा विश्वास संपादन करणारे होते.

१९३९ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मतभेदांमुळं काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्या वेळी सर्वानुमते राजेंद्रबाबूंचीच त्या पदावर निवड करण्यात आली.

१९४२ च्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सरकारनं त्यांना इतर राष्ट्रीय नेत्यांसमवेत स्थानबद्ध करून ठेवलं होतं.

राजेंद्रबाबूंनी हिंदी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांनी हिंदी भाषेत ‘आत्मकथा’, ‘चंपारण में महात्मा गांधी’, ‘खादी का अर्थशास्त्र’, ‘बापू के कदमों में’ वगैरे ग्रंथ लिहिले. पत्रकार म्हणूनही आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं. ‘सर्चलाइट’ आणि ‘देश’ ही वृत्तपत्रं त्यांनी चालवली. या वृत्तपत्रांतून त्यांनी लोकजागृतीचं कार्य केलं.

सप्टेंबर १९४६ मध्ये हंगामी सरकार अस्तित्वात आलं. राजेंद्रबाबू अन्न आणि शेतकी खात्याचे मंत्री झाले. राजेंद्रबाबूंना शेतकी व्यवसायाची उत्तम जाण होती. त्यांनी ‘अधिक धान्य पिकवा’ मोहीम देशात सर्वत्र पोहोचवली.

डिसेंबर १९४६ मध्ये घटना समितीच्या अध्यक्षपदावर सर्वानुमते त्यांची निवड झाली. १९४६ ते १९४९ च्या काळात त्यांनी घटना समितीचं सूत्रसंचालन स्वतंत्र, खुल्या आणि न्याय्य रीतीनं करून सर्वांचा विश्वास संपादन केला.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्या दिवशी झालेल्या स्वातंत्र्य- सोहळ्यात भाषण करताना राजेंद्रप्रसाद म्हणाले,

‘आज आपला देश स्वतंत्र झाला आहे. हा दिवस केवळ आनंदोत्सव साजरा करण्याचा नाही, तर आपल्या सर्वांना अपेक्षित असलेला नवा भारत निर्माण करण्यासाठी संकल्प करायचा आहे. आपण अशा भारताची उभारणी करूया, की जिथं सर्वांना स्वातंत्र्याचे हक्क राहतील. जिथं दारिद्र्य, अज्ञान, रोगराई संपुष्टात येईल. जिथं गरीब, श्रीमंत, उच्च-नीच भेदभाव राहणार नाही. अस्पृश्यता नष्ट झालेली असेल. जिथं माणसांची कोठलीही पिळवणूक होणार नाही. जिथं आदिवासी आणि सर्व मागासलेल्या जातींना इतरांबरोबर विकासाची संधी मिळावी, म्हणून खास तरतुदी केलेल्या असतील. जिथं कोट्यवधी जनतेला पुरेसं अन्न, वस्त्र आणि निवारा उपलब्ध झालेला असेल. जिथं शेतं, कारखाने यांतून राबणारे शेतकरी आणि कामगार, तसेच घराघरांतून काम करणारे कारागीर सुखासमाधानानं आपापली कामं करताना दिसतील आणि आपला देश सुजलाम् सुफलाम् होईल.’

२६ जानेवारी १९५० रोजी भारताचं संविधान अमलात आलं. भारताच्या राष्ट्रपतींची निवड करायची वेळ आली, तेव्हा त्या पदासाठी राजेंद्रबाबूच सर्वांना सर्वतोपरी योग्य वाटले.

लागोपाठ दोन वेळा या पदावर त्यांची निवड करण्यात आली.

भारताचे सर्वोच्च पदाधिकारी या नात्यानं त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यांनी म्हटलं,

‘प्रशासकांनी यापुढं केवळ पारंपरिक पद्धतीनं राज्यकारभार चालवून भागणार नाही. त्यांना राष्ट्र उभारणीच्या विविध कार्यक्रमांमध्ये पुढाकार घ्यावा लागेल. विकासाच्या विविध योजना राबवाव्या लागतील. यापुढं त्यांचे दैनंदिन संबंध केवळ फाइलीतील कागदांशी राहणार नसून जित्याजागत्या माणसांशी, जनतेशी वाढत्या प्रमाणावर येणार आहेत. अशा वेळी प्रशासकांनी सेवाभावानं आणि तत्परतेनं लोकांची कामं पार पाडली पाहिजेत. त्यासाठी कामाचे तपशील तर समजून घ्यावे लागतीलच; पण लोकांनाही नीट समजून घ्यावं लागेल. यापुढं केवळ कार्यक्षमता पुरेशी असून चालणार नाही, तर तिच्या जोडीला जबाबदारीची जाणीव आणि सचोटीदेखील राज्यकारभारात आवश्यक ठरणार आहे.’

मे १९६२ मध्ये राजेंद्रबाबू राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाले.

त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला.

निवृत्तीनंतर आयुष्याच्या अखेरपर्यंत ते आपल्या ‘सदाकत आश्श्रमा’तच राहिले.

दि. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांचं निधन झालं.