STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT)अंतर्गत संकलित चाचणी-१ करिता शाळा भेटीबाबत pat exam shalabheti timetable
संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण
(Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत
प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.
२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण
(Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत
प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT)अंतर्गत संकलित चाचणी-१ करिता शाळा भेटीबाबत शासन निर्णय येथे पहा Click Here
३. ४. मा. संचालक, रा.शै.सं.प्र.प.म.पुणे, यांचे पत्रजा.क्र. राशैसंवप्रपम/मूल्यमापन/सं.चा.
STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४
५ जिल्हा पत्र/२०२४-२५/०४५०२ दि.२४/०९/२०२४ . मा. संचालक, रा.शै.सं.प्र.प.म. पुणे, यांचे पत्रजा.क्र. राशैसंवप्रपम/मूल्यमापन/सं.चा.
जिल्हा पत्र शु.प./२०२४-२५/०४५८८दि.२६/०९/२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी
खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून पायाभूत
चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित, व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता ३ री ते ९ वी तील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खाजगी अनुदानित सर्व शाळातील विद्यार्थ्यांची संकलित चाचणी -१ होणार आहे.
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोकाप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम) गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) यगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन
करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ घेण्याची आवश्यकता नाही.
तरी सदर कालावधीत उपरोक्त सर्व अधिकाऱ्यांनी दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत किमान
तीन शाळाभेटी कराव्यात. सदर शाळाभेटी करताना सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांचा यात समावेश असावा. तसेच सदर शाळाभेटी संदर्भातील माहिती https://forms.gle/NM4cM6AUhfwuMrAm9 या लिंकमध्ये त्याच दिवशी भरण्यात यावी.
संकलित चाचणी १ दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ च्या शाळाभेटीसाठी उपरोक्त सर्व अधिकारी यांनी
आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या संपर्क तालुक्यात सदर भेटीसाठी आवश्यकतेनुसार आदेशित
करावे. तसेच संबंधित सर्व जिल्ह्यातील प्राचार्य, (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) यांनी PAT शाळाभेटीचा व संकलित
चाचणी-१ नंतर १०% शाळांच्या १०% विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकांची/उत्तरपत्रिकांची फेरतपासणी बाबतचा एकत्रित
अहवाल सदर कार्यालयास मूल्यमापन विभागाच्या evaluationdept@maa.ac.in या इमेल वर पाठविण्यात यावा.