शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जमा रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) वर्ग करण्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्षास मान्यता देणेबाबत national pension scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जमा रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) वर्ग करण्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्षास मान्यता देणेबाबत national pension scheme 

शासन अनुदानित विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक /माध्यमिक / उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा /निवासी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जमा रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) वर्ग करण्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्षास मान्यता देणेबाबत

शासन निर्णय :-

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या शासन अनुदानित विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा / निवासी शाळांमधील दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी वा तद्नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय, संदर्भ क्र.१, दि.२७.०९.२०२४ अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागु करण्यात आली आहे.

उक्त प्रणाली अंतर्गत विजाभज अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) खाती जमा झालेली रक्कम वर्ग करण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन लेखाशिर्ष उघडण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय, प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी)-१, मुंबई यांच्या अनौपचारीक संदर्भक्र.ख.वि./चा-१/युओआर-२१८/२०२४-२५/१६५७, दि.०५.१२.२०२४ तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.७०/व्यय-१४, दि.२२.०१.२०२५ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपल करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१२९१३१५४८९०३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

Join Now