आंतरजिल्हा बदली व बिंदू नामावली बाबत ग्रामविकास विभागाने दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने बैठकीचे इतिवृत्त bindunamavali inter district transfer
आंतरजिल्हा बदली व बिंदू नामावली याबाबत ग्रामविकास विभागाने दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीचे इतिवृत्त.
विषय :- श्री. गोपिचंद पडळकर व इतर वि.प.स. यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम ९२ अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास सूचना क्र. २९२४ मध्ये मा. मंत्री (ग्रामविकास) यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीचे इतिवृत्त.
महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मा. मंत्री (ग्रामविकास) यांचे मंत्रालयीन दालनात बुधवार दि.३१/७/२०२४ रोजी दुपारी ४.०० वा. झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रत पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सोबत जोडली आहे.
विषय
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये विशेष अ संवर्ग-१ मधील शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी संधी व मिळत नाही. याबाबत शासनाने कार्यवाही करावी व अशा शिक्षकांना बदलीची संधी उपलब्ध करुन द्यावी.
बैठकीतील निदेश
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या ह्या दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे करण्यात येतात. सदर शासन निर्णयातील तरतुदी स्पष्ट आहे. माहे डिसेंबर, २०२३ मध्ये झालेल्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी शासनाने दि.२३.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये आंतरजिल्हा बदलीसाठी १० टक्केपेक्षा कमी रिक्त पदे असण्याची अट शिथील केली होती व त्यानुसार बदली प्रक्रिया राबविण्यात येवून सर्व इच्छूक शिक्षकांना संधी देण्यात आली.
विषय
जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या रोष्टर प्र तपासणीमध्ये अनियमितता असून, व ते तपासून सुधारणा करण्यात यावी. रोष्टरमध्ये अराखीव अ पदावरील उमेदवारांना मागासवर्ग बिंदुवर दाखविले आहे.
बैठकीतील निदेश
जिल्हा परिषद, सोलापूर येथील भज (क) प्रवर्गाच्या शिक्षक पदांच्या बिंदुनामावलीची तपासणी करण्यासाठी विभागीय शिक्षण उप संचालक, पुणे विभाग, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. सदर समितीने शालेय शिक्षण विभागाला अहवाल सादर केलेला आहे. तथापि, समितीपुढे बिंदुनामावलीतील त्रुटीसंदर्भात नवीन कागदपत्रे/दस्ताऐवज सादर झाल्यास त्यानुषंगाने तपासणी करुन बिंदुनामावलीमध्ये आवश्यकता असल्यास सुधारणा करण्यात याव्यात.
विषय
सर्व जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या बिंदुनामावल्या तपासून घ्याव्यात.
बैठकीतील निदेश
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बिंदुनामावली संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपलब्ध कागदपत्रे, दस्ताऐवज तपासून तात्काळ कार्यवाही करुन आवश्यकता असल्यास बिंदुनामावली सुधारित करुन मागासवर्ग कक्षाकडून तपासून घ्याव्यात.
अंमलबजावणी यंत्रणा
१) शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
३) जिल्हा परिषद, सोलापूर शिक्षक पदांच्या बिंदुनामावली तपासणीसाठी नियुक्त समिती
४) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
आंतरजिल्हा बदली व बिंदू नामावली बाबत ग्रामविकास विभागाचे शासन परिपत्रक येथे पहा