“भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महामानव डॉ. भीमराव आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशच्या महू या छोट्याश्या गावी झाला. यांना बाबासाहेब या नावानेही ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ होते. त्यांचे वडील हे ब्रिटिश भारतीय सेनेत एक सुभेदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई सकपाळ होते.
काळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतील असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला. हे असताना देखील बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होते. ते एक प्रतिभावान विद्यार्थी होते. त्यांनी पुढे कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.
भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. देशातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. दलित आणि मागास प्रवर्गातील लोकांच्या मानवी हक्कांसाठी ते सतत लढत राहिले. त्यांनी १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एक न्यायवादी, राजनीतीज्ञ, अर्थशास्त्री, मानवतावादी, लेखक होते. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्ती आणि आपल्या देशाचे खरे नायक होते.
६ डिसेंबर १९५६ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. त्या नंतर १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले.