विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत increase students achivement level 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत increase students achivement level 

संदर्भ :१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय समक्रमांक दि. ०७.०२.२०२४

शासन शुद्धीपत्रकः

उपरोक्त संदर्भाधीन दि. ०७.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील परि. क्र. ४ मध्ये

“यासाठी उपसचिव/सहसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी आणि कक्ष अधिकारी/अवर सचिव (रोख शाखा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणुन घोषित करण्यात येत आहे. संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरचा निधी कोषागारातून आहरीत करुन शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना अंमलबजावणीसाठी सुपूर्द करावा व सदरचा निधी हा दिलेल्या उद्देशासाठीच खर्च करण्यात यावा.”

याऐवजी

“यासाठी आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना “नियंत्रक अधिकारी आणि लेखाधिकारी प्राथमिक शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणुन घोषित करण्यात येत आहे. संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरचा निधी कोषागारातून आहरीत करुन शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना अंमलबजावणीसाठी सुपूर्द करावा व सदरचा निधी हा दिलेल्या उद्देशासाठीच खर्च करण्यात यावा.”

असे वाचावे

शासन शुद्धीपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१३१/एसडी-१

२.. सदरचा शासन शुद्धीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असुन त्याचा संकेतांक २०२४१२०५१०५१३४५६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.