जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत teacher request transfer 

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत

संदर्भ :-

१) उपसचिव, ग्राम विकास विभागाकडील पत्र क्रं. संकिर्ण-२०२४/प्र.क्रं. ४५/आस्था-१४ दि.११/०३/२०२४

२) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रं. जिपब- २०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ दि.१८ जून २०२४

३) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सातारा यांची मान्य टिपणी दि. २४/७/२०२४

४) जा.क्रं. शिक्षण/प्राथ/आस्था-२/५५९३/२०२४दि. २४/०७/२०२४

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये तुम्हांस कळविणेत येते की, संदर्भ क्रं. १ च्या शासन पत्रानुसार शिक्षक संवर्गाच्याशिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे (पवित्र पोर्टलद्वारे) शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सदर भरती प्रक्रियेतील शिक्षण सेवक यांना पदस्थापना देण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाकडील शासन निर्णय क्रं. संकिर्ण-२०२३/१७४/टिएनटि-१ दि.२१/०६/२०२३ अन्वये आवश्यक ती कार्यवाही करणे बाबत कळविलेले आहे.

उपरोक्त संदर्भ क्रं. ४ नुसार आपले कडील विहीत प्रपत्रातील माहिती यापुर्वी पार पडलेल्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2023 कामी सादर केलेल्या माहिती प्रमाणे ENGLISH FONT मधून व देण्यात आलेल्या गुगल स्प्रेडशिटवर भरुन दि. ३१/०७/२०२४ पर्यंत प्रस्ताव सादर करण्यास कळविण्यात आले होते. त्यानुसार सातारा, कोरेगांव व पाटण या तालुक्यांचे प्रस्ताव प्राप्त आहेत. इतर तालुक्यांचे प्रस्ताव प्राप्त नसल्याने बदली प्रक्रियेची कार्यवाही करता येत नाही तरी उर्वरित सर्व तालुक्यांनी दि.१६/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करावेत. तसेच स्प्रेडशिटमध्ये परिपूर्ण माहिती भरुन घ्यावी.

सर्व तालुक्यातील बदली कामकाज करणारे लिपीक/कर्मचारी/विस्तार अधिकारी यांनी दि. १६/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सातारा येथे बदली कामकाज करणेसाठी उपस्थित ठेवावे.

Leave a Comment