पगारी रजा व बिनपगारी रजा types of leave 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पगारी रजा व बिनपगारी रजा types of leave 

(१) अर्जित रजा नियम ५० व ५१

४. रुग्णालयीन रजा नियम ७८

५. खलाशांची रजा नियम ७८

६. क्षयरोग/कर्करोग/कुष्ठरोग/पक्षपात रजा नियम ७९ व परिशिष्ट ३

७. अध्ययन रजा नियम ८० व त्यापुढील

* प्रत्येक कैलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या १ तारखेस प्रत्यकी १५ दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा जमा केली जाते.

* ही रजा ३०० दिवसांच्या कमाल मर्यादेपर्यंत साठविता येते व सेवानिवृत्तीच्यावेळी शिल्लक रजेचे

रोखीकरण करता येते.

* प्रत्येक पूर्ण कैलेंडर महिन्याला अडीच दिवस दराने ही रजा जमा केली जाते. (६ महिन्यापेक्षा कमी कर्तव्य कालावधी असल्यास)

* सेवेचा कैलेंडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावयाचा असती.

* असाधारण रजा / अकार्य दिन या कालावधीसाठी १/१० या दराने ही रजा कमी केली जाते.

*रजेचे दिवस अपूर्णांकात असल्यास ते पुढील दिवसांशी पूर्णाकित केले जातात.

* ही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते.

* परिशिष्ट ५ मधील नमुना १ मध्ये या रजेसाठी अर्ज करावयाचा असतो.

( २) अर्धवेतनी रजा नियम ६०

* प्रत्येक कैलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या १ तारखेला प्रत्येकी १० दिवस याप्रमाणे

दोन हप्त्यांमध्ये ही रजा आगाऊ जमा करण्यात येते.

* ही रजा पूर्ण कैलेंडर महिन्याला ५/३ या दराने जमा करण्यात येते.

*कॅलेंडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावयाचा असतो.

* अकार्य दिनाच्या कालावधीसाठी ही रजा १/१८ या दराने कमी केली जाते.

* रजेचे दिवस अपूर्णांकात येत असल्यास तो नजीकच्या दिवसात पूर्णांकात केले जातात.

* ही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते. * या रजेच्या साठवणूकीवर मर्यादा नाही परंतु सेवानिवृत्तीच्या वेळी शिल्लक रजा व्यवगत होते.

8

* या रजेसाठी विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असतो. (परिशिष्ट ५ नमुना १)

(३) परिवर्तीत रजा नियम ६१

ही रजा वैद्यकीय प्रमाणपत्रावर खालील अटीच्या अधीन राहून मंजूर केली जाते

* अशा रजेनंतर कर्मचारी कामावर परत येण्याची रजा मंजूर करणा-या अधिका-याची खात्री पटली पाहिजे.

* पूर्णवेतनी रजेच्या स्वरुपात मंजूर केली जाते.

* रजा कालावधीच्या दुप्पट दिवस अर्थवेतनी रजेच्या खाती खर्ची टाकले जाते.

* कर्मचारी सेवेत परत न आल्यास या रजेचे रुपांतर अर्धवेतनी रजेत केले जाते व अति प्रदानाची

रक्कम वसूल करण्यात येते.

* या रजेच्या कालाधीत पूर्ण वेतन देय होते.

अपवाद खालील प्रकरणी ही रजा मंजूर करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसते.

* प्रसूती रजेला जोडून ६० दिवसांच्या मर्यादेपर्यंत,

* लोकहितास्तव उच्च अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ९० दिवसापर्यंत,

* विपश्यनेसाठी १४ दिवसांपर्यंत.

(४ ) अनार्जित रजा नियम ६२

* अर्जित रजा, अर्धचेतनी रजा खात्यावर शिल्लक नसल्यास ही रजा मंजूर करता येते.

* ही रजा अर्थचेतनी रजेच्या स्वरुपातच मंजूर केली जाते.

* संपूर्ण सेवेच्या कालावधीत कमाल ३६० दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.

* एका वेळी वैद्यकीय प्रमाणपत्रा खेरीज ९० दिवसांपर्यंत व वैद्यकीय प्रमाणपत्र धरुन जास्तीत जास्त

१८० दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.

* ही रजा मंजूर केल्यानंतर जेवढी अर्धवेतनी रजा अर्जित होते त्या रजेमधून अनर्जित रजा बजा करण्यात येते.

* ही रजा मंजूर केल्यानंतर कामावर परत न आल्यास रजा वेतनाची वसूली केली जाते.

* ही रजा फक्त सेवेत कायम असलेल्या कर्मचा-यांनाच मंजूर करता येते.

(५) असाधारण रजा नियम ६३

* कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल किंवा इतर रजा अनुज्ञेय असताना देखील स्पष्टपणे असाधारण

रजेची मागणी केली असेल तरच ही रजा मंजूर करता येते.

कायम सेवेतील कर्मचा-याला कोणत्याही प्रकारची रजा ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी

मंजूर करता येत नाही

अस्थायी कर्मचा-याला ही रजा खालील मर्यादेपर्यंत मंजूर करता येते. – कोणताही कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय ३ महिन्यांर्पत.

– १ वर्षाच्या सेवेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे ६ महिन्यांपर्यंत वर्षाच्या सेवेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे १२ महिन्यांपर्यत

५ – १ वर्षाच्या सेवेनंतर कर्करोग, मानसिक रोग यासाठी १२ महिन्यांपर्यंत

– १ वर्षाच्या सेवेनंतर क्षयरोग, कृष्ठरोग यासाठी १८ महिन्यांपर्यंत

– ३ वर्षाच्या सेवेनंतर लोकहितार्थ उच्च अभ्यासक्रमासाठी २४ महिन्यांपर्यत

विशेष रजेची वैशिष्टे

(१) प्रसुती रजा / गर्भपात रजा नियम ७४

महिला शासकीय कर्मचा-यांना प्रसुती रजा खालीलप्रमाणे अनुज्ञेय ठरते :-

– दोनपेक्षा कमी हयात मुले असावीत या पूर्व शर्तीवर.

– स्थायी महिला कर्मचा-यांना ९० दिवस पूर्ण वेतनी रजेच्या स्वरुपात.

अस्थायी महिला कर्मचारी

– दोन वर्षापेक्षा अधिक सेवा ९० दिवस पूर्ण वेतनी रजेच्या स्वरुपात

– दोन वर्षाच्या सेवेनंतर ९० दिवस अर्थ वेतनी रजेच्या स्वरुपात

– एक वर्षापेक्षा कमी सेवा अनुज्ञेय नाही.

गर्भस्वाव / गर्भपात

– प्रसुती रजेच्या वरील अटी व शर्तीच्या अधीन राहून सेवेच्या कालावधीत ४५ दिवस

(२) विशेष विकलांगता रजा

हेतुपुरस्सर झालेल्या इजेबद्दल नियम ७५

* पदाची कर्तव्ये बजावत असतांना, कर्मचा-याच्या कामाचे स्वरूप धोकादायक असल्यामुळे, किंवा कोणी हेतुपुरस्सर एखाद्या कर्मचा-यास कांही इजा केली व त्यामुळे तो विकलांग झाल्यास ही रजा अनुज्ञेय आहे.

* विकलांगतेशी सबंधित घटना घडल्यापासून शक्यतो तीन महिन्याच्या आत विकलांगता उघड होणे आवश्यक, परंतु विकलांगता तीन महिन्यांतरच दिसून आल्यास वैद्यकीय प्राधीका-याच्या खात्रीनंतर ही रजा अनुज्ञेय आहे.

• रजा कोणत्याही एका विकलांगतेच्या परिणामी २४ महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये.

विकलांगता रजा वेतन

पहिल्या १२० दिवसांसाठी अर्जित रजा वेतनाइतके.

उरलेल्या कालावधीसाठी अर्थवेतनाची रजेइतके.

स्वेच्छेनुसार कर्मचारी आणखी जास्तीत जास्त १२० दिवसांच्या कालावधींसाठी अर्जित रजा वेतन घेऊ शकतो. अशावेळी रजा अर्धचेतनी रजेच्या खाती खर्ची टाकण्यात येते.

(३) विशेष विकलांगता रजा

अपघाती इजेबद्दल नियम ७६

10

*

पदाच्या कर्तव्याचे योग्य पालन करताना / त्याच्या परिणामी इजा झाल्यास.

– विकलांगता ही पदाच्या कर्तव्याच्या परिणामी झाल्याचे सक्षम प्राधिका-याचे च प्राधिकृत

वैद्यकीय अधका-याने प्रमाणित करणे आवश्यक.

– रजेच्या कालावधी जास्तीत जास्त २४ महिने.

अपघाती विकलांगता रजा वेतन १. पहिल्या १२० दिवसांसाठी

२. उरलेल्या कालावधीसाठी अर्जित रजा वेतनाएवढी अर्थवेतनी रजा वेतनाएवढी

(४) रुग्णालयीन रजा नियम ७७

वर्ग ४ चे कर्मचारी व यंत्रसामग्री, स्फोटक द्रव्ये विषारी औषधे हाताळणारे वर्ग ३ चे कर्मचारी

यांनाच फक्त अनुज्ञेय असते.

पदाची कर्तव्ये पार पाडत असताना परिणामस्वरूपी रजेचे कारण असावे.

रजेचा कालावधी जास्तीत जास्त २८ महिने.

रजा वेतन

१. पहिल्या १२० दिवसांसाठी अर्जित रजा वेतनाएवढा

२. उरलेल्या कालावधीसाठी अर्धचेतनी रजा चेतनाएवढी.

(५) क्षयरोग / कर्करोग / कृष्ठरोग/पक्षाघात/एडस रजा नियम ७९

*ही रजा मंजुर करण्यासंबंधीचे नियम परिशिष्ट ३ मध्ये नमूद करण्यात आले आहेत.

* अस्थायी परंतु तीन वर्षांहून जास्त काळ अखंडीत सेवा झालेल्यांना या रजेचा व अनुषंगिक

सचलतींचा लाभ देय आहे.

* एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत सेवा झालेल्यांना आर्थिक सवलती व पूर्ण वेतनी क्षय रजा अनुज्ञेय नाही. मात्र अन्य सवलती (उदा. औष्धेपचार) मिळतील.

* एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्यांना तसेच रोजंदारी / अंशकालीन कर्मचारी यांना या रजेच्या

व अनुषंगिक कोणत्याही सवलती देय नाहीत.

* निलंबनाधीन कर्मचा-याला वरीलप्रमाणे अनुज्ञेय. तपासणी मुबई जी.टी./ जे.जे. रुग्णालय / जिल्हा रूग्णालय.

*

* तपासणी खर्च आकारला जात नाही.

रजा मंजुरी :- * प्रथम खात्यावर शिल्लक असलेली अर्जित रजा तद्नंतर एक वर्षाच्या मर्यादेपर्यंत क्षयरोग रजा

तद्नंतर वैद्यकीय मंडळाच्या शिफारशीवरून असाधारण रजा अनुज्ञेय. एकूण रजा कालावधीची मर्यादा तीन वर्षे.

* क्षयरोग झालेल्या अस्थायी कर्मचा-यांस, सेवेत खंड पडू नये म्हणून, कमाल एक वर्षापर्यंत

असाधारण रजा मंजूर करता येते.

* वरील दोन्ही असाधारण रजा वेतनवाढ व निवृत्ती वेतनासाठी सेवा म्हणून ग्राहय आहेत.

*सक्षम अधकारी प्रादेशिक अधिकारी / विभाग प्रमुख.

* रजेवर असताना उपचार शासकीय / खाजगी वैद्यकीय अधिकारी.

* कामावर रुजू होण्यासाठी वैद्यकीय मंडळाचे वैद्यकीय सुदृढता प्रमाणपत्र जरूर, * आर्थिक सवलत विशेष आहार खर्च, विशेष औषधांचा खर्च, आरोग्यधामाचा खर्च दुस-या / तिस-यावेळी सवलती मंजूर करण्यास सक्षम प्राधिकारी: – विभागप्रमुख – दुसयांदा

शासन तिस-यांदा, चौथ्यांदा क्षयरोग रजा अनुज्ञेय नाही.

*वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती प्राधिकारी पुनर्नियुक्ती देऊ शकतो.

* कर्करोग / कृष्ठरोग / पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचा-यांना क्षयरोग सवलती लागू आहेत. * क्षयरोग सवलत तीन हयात मुलांएवढे मर्यादित असलेल्या कुटुंबांच्या कर्मचा-यास अनुज्ञेय ठरतात.

* सेवानिवृत्तीनंतर सवलती बंद होतात.

(७) अध्ययन रजा

* कर्तव्यक्षेत्राशी संबंध असलेल्या विषयातील उच्च शिक्षण / पाठ्यक्रम भारतामध्ये किंवा

भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी.

* या रजेसाठी कमीत कमी पाच वर्षाची सेवा आवश्यक, मात्र सेवा निवृत्ती पुढील तीन वर्षात असल्यास अनु‌ज्ञेय नाही.

* रजा संपल्यानंतर पुढे किमान तीन वर्षे शासन सेवा करणे बंधनकारक, या तीन वर्षात राजीनामा देता येणार नाही व कर्मचा-यांनी तसा आग्रह धरल्यास अध्ययन रजा काळात दिलेले वेतन भत्ते वसूल करण्यात येतात. याबाबत कर्मचा-यांनी रजेपूर्वी बंधपत्र देणे आवश्यक आहे.

* हक्क म्हणून ही रजा मागता येत नाही.

* एकाच व्यक्तीला ही रजा वारंवार मंजूर करता येत नाही.

* भारताबाहेरील अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम भारतात उपलब्ध नसल्याचे सक्षम प्राधिका-

याचे प्रमाणपत्र आवश्यक.

* अभ्यासक्रम / प्रशिक्षण लोकहिताच्या दृष्टिने निश्चित लाभदायक असल्याचे सक्षम प्राधिका- याचे प्रमाणपत्र आवश्यक.

* अध्ययन रजा कालवधी १२ ते २४ महिने. इतर रजांना जोडून ही रजा दिल्यास एकूण रजा कालावधी २८ महिन्यापेक्षा जास्त होता कामा नये.