निवृत्तीवेतनाचे प्रकार नियम rules of retirement
* नियतययमान निवृत्तीवेतन
* पूर्णसेवा निवृत्तीवेतन
* रुग्णता निवृत्तीवेतन
* भरपाई निवृत्तीवेतन
* सक्तीच्या सेवानिवृत्तीनंतरचे निवृत्तीवेतन
* अनुकंपा निवृत्तीवेतन
*कुटुंबनिवृत्तीवेतन
कोणत्याही प्रकारचे निवृत्तीवेतन खालील २ बाबींवर अवलंबून असते.
* कमीत कमी १० वर्षाची अर्हताकारी सेवा म्हणजेच २० सहामाही कालावधी नियम ११०(२)
* अर्हताकारी सेवेची गणना सहामाही कालावधीत केली जाते नियम ११० (३) * तीन महिने किवा त्यापेक्षा अधिक असलेल्या सेवेचा कालावधी १ सहामाही कालावधी म्हणून
धरला जातो, तीन महिन्यापेक्षा कमी कालावधी विचारात घेतला जात नाही. * जास्तीत जास्त ६६ सहामाही कालावधी विचारात घेतले जातात. ३३ वर्षे नियम ११०(३) दि.०१.०१.२००६ पासून २० वर्षे सेवा (४० सहामाही) झालेल्यांना पूर्ण निवृत्ती वेतन.
* निवृत्तीवेतनाचे सूत्र अ-२० वर्षाच्या सेवेसाठी निवृत्तीवेतनार्ह वेतनाच्या ५०% किंवा शेवटच्या महिन्यात घेतलेल्या मूळ वेतनाच्या ५०% यापैकी जी रक्कम कर्मचाऱ्याला लाभदायक ठरेल ती रक्कम.
ब- १० वर्ष किंवा त्यापेक्षा जासत परंतु ३३ वर्षापेक्षा कमी असलेल्या अर्हताकारी सेवेसाठी वरील अ च्या प्रमाणात.
* निवृत्तीवेतनार्हवेतन नियम ६० व शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिये १०९९/३०२/ सेवा ४ दिनांक १५-४४-१९९९ व शासन निर्णय वित्त विभाग क्र. सेनिवे १००४/१८५/सेवा ४ दिनांक २०/७/२००४ आणि दि.२२.०४.२००९ ची वित्त विभागाची अधिसूचना, शा.नि.
वित्त विभाग दि.२२.०६.२००९, दिनांक १/१/२००६ रोजी किंवा त्यानंतर निवृत्त होणा-या कर्मचा-यांचया बाबतीत शेवटच्या
* १० महिन्यांचे मूळ वेतन अधिक मूळ वेतनाच्या ५० % महागाई वेतन यांची सरासरी.
* मूळ वेतना व्यतिरिक्त इतर कोणतीही वित्तलब्धी विचारात घेतली जात नाही.
* मात्र निवृत्तीवेतनधारक ज्या पदावरुन निवृत्त झालेला आहे त्या पदाला दि. १/१/१९९६ पासून जी सुधारित वेतनश्रेणी विहीत केलेली असेल त्या वेतनश्रेणीच्या किमान टप्प्याच्या ५० % पेक्षा कमी असता कामा नये.