छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत state level kabbaddi competition 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत state level kabbaddi competition 

वाचा :-

१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. क्रीस्पर्धा-२०११/प्र.क्र.४५/क्रीयुसे-२, दि.०३ जानेवारी, २०१२

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. क्रीस्पर्धा-११२१/प्र.क्र.३१/क्रीयुसे-२, दि.१५ फेब्रुवारी, २०२३

३. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे क्र. क्रीयुसे/स्व.जा.कु/स्पर्धा/२०२४-२५/का-४/१६५५, दि. २९.०८.२०२४

प्रस्तावना :-

राज्याचे क्रीडा धोरण, २०१२ मधील मुद्दा क्र. ५.४ नुसार छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रतिवर्ष राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येते. संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णय दि. १५ फेब्रुवारी, २०२३ अन्वये सदर अनुदानामध्ये वाढ करुन रु.७५.०० लक्ष एवढी अनुदान मर्यादा विहित करण्यात आली आहे.

त्यानुसार दि. १५ ते १९ जानेवारी, २०२५ या कालावधीत बारामती, जि. पुणे येथे आयोजित करण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कबड्डी स्पर्धा आयोजनासाठी रु.७५.०० लक्ष इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्याकरीता रु.७५.०० लक्ष (रुपये पंचाहत्तर लक्ष फ़क्त) इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर रक्कम आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांच्या अधिनस्त ठेवण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. या संदर्भात होणारा खर्च “मागणी क्र.ई ३, २२०४ क्रीडा व युवक सेवा १०४ क्रीडा व खेळ (३१) (०१) राष्ट्रीय शिव चषक कबड्डी स्पर्धा (२२०४-२०४६) ३१ सहायक अनुदाने वेतनेतर या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ मधील मंजूर तरतूदीमधून भागविण्यात यावा. सदर अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आले आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे.

1. उपरोक्त निधी आवश्यकतेनुसार मान्य निकषानुसार खर्च करण्यात यावा. ज्यावेळेस निधी प्रत्यक्ष खर्च करावयाचा त्याच वेळी आहरीत करावा. शासन लेख्याबाहेर बँक खात्यात हा निधी ठेवू नये.

॥. राज्य शासनामार्फत वेळोवेळी वित्त विषयक निर्गमित करण्यात आलेले विविध आदेश / नियम / शासन निर्णय वित्तीय नियमावली यांची अंमलबजावणी करुन वरील वितरीत तरतूदीचा विनियोग करण्याच्या अधीन राहून उपरोक्त तरतूद वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. शासनाच्या सूचनांनुसार उपरोक्त तरतुद खर्च करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे / लेखाधिकारी, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी व आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय, नियोजन विगाभाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.३८९/१४७१, दि.०७.१०.२०२४ व अनौपचारीक संदर्भ क्र.१७/१४७१, दि.०९.०१.२०२५ अन्वये तसेच वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.११८५/व्यय-५.दि.२३.१०.२०२४ व अनौपचारीक संदर्भ क्र.४२/व्यय-५. दि.१०.०१.२०२५ अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०११०१७२४०६५२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,