महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून “खो-खो विश्वचषक स्पर्धा २०२५” च्या आयोजनाकरीता निधी मंजूर करणेबाबत kho kho federation nidhi manjur 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून “खो-खो विश्वचषक स्पर्धा २०२५” च्या आयोजनाकरीता निधी मंजूर करणेबाबत kho kho federation nidhi manjur

खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (KKFI) या संघटनेस महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून “खो-खो विश्वचषक स्पर्धा २०२५” च्या आयोजनाकरीता निधी मंजूर करणेबाबत.

१) शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्र. राक्रीधो १०९६/प्र.क्र.३३०/क्रीयुसे-१, दि. ३१ जुलै, १९९७.

२) अध्यक्ष, खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया यांचे दि. १२.१२.२०२४ रोजीचे पत्र.

३) सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांचे पत्र क्रमांक क्रीयुसे/मराक्रीप/खो-खो वर्ल्डकप/स्पॉन्सरशिप/२०२४-२५/का-६/३७२२, दि. ०६.०१.२०२५.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्यात खेळाच्या विकासासाठी विविध स्तरावर कार्यरत असलेल्या नोंदणीकृत संस्था/संघटनांना शासनातर्फे महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून अधिकृत राज्य/राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनाकरिता आर्थिक सहाय्य करण्याची योजना संदर्भाधीन क्र. १ च्या शासन निर्णयान्वये सुरू आहे. खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (KKFI) या संघटनेच्या वतीने “खो-खो विश्वचषक-२०२५” या स्पर्धेचे आयोजन दि. १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर “खो-खो विश्वचषक- २०२५” या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संघटनेस रु. १० कोटी इतका निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

दि. १३ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित “खो-खो विश्वचषक-२०२५” या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी “विशेष बाब” म्हणून रु. १०,०० कोटी इतका निधी मंजूर करून, वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी खाली नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे :-

१. रक्कम ज्या कारणासाठी मंजूर करण्यात आली आहे त्याच कारणासाठी खर्च करणे बंधनकारक राहील.

२. मंजूर रकमेपैकी शिल्लक राहीलेली रक्कम क्रीडा संचालनालयामार्फत शासनास चलनाद्वारे

जमा करण्यात येईल.

३. सदर रकमेचे विनियोग प्रमाणपत्र स्पर्धा संपल्यापासून १ महिन्याच्या आत सादर करणे

बंधनकारक राहील.

४. सदर रकमेच्या विनियोगाचे लेखे शासनाच्या कोणत्याही लेखाविषयक लेखापरिक्षणासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

५. खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया यांना सदर स्पर्धा आयोजनासाठी अन्य प्रायोजक, कॉर्पोरेट सेक्टर व अन्य स्रोतांद्वारे निधी मंजूर झाल्यास सदर निधी तसेच राज्य शासनाकडून मंजूर होणारा निधी एकत्रित विचारात घेऊन, त्यापेक्षा स्पर्धा आयोजनासाठी झालेला खर्च कमी असल्यास उर्वरित रक्कम फेडरेशनकडून शासनास परत करणे आवश्यक राहील.

२. सदर खर्च सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता ” २२०४ क्रीडा व युवक सेवा- (०२) (०३) महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेमार्फत नोंदणीकृत क्रीडा संस्थांना सहायक अनुदान (राज्य) (कार्यक्रम) ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) (२२०४ १९४३) या लेखाशिर्षाखालील मंजूर तरतूदीमधून भागविण्यात यावा.

३. वित्त विभागाच्या दि. २५.०७.२०२४ च्या परिपत्रकातील सूचनांनुसार उपरोक्त तरतूद खर्च करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. यासाठी संबंधित लेखाधिकारी, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय, नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्र. १४/१४७१, दि. ०८.०१.२०२५ व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र. २७/व्यय-५, दि. ०८.०१.२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०१०९१५५९०१८९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,