राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान मागणीची कार्यपध्दती शासन निर्णय rajiv gandhi vidhyarthi apghat anudan yojna 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान मागणीची कार्यपध्दती शासन निर्णय rajiv gandhi vidhyarthi apghat anudan yojna 

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व सानुग्रह अनुदान मागणीची कार्यपध्दती

संदर्भः- १. शासन निर्णय क्रमांकः पीआरई-२०११/प्र.क्र.२४९/प्राशि-१, दि.०१.१०.२०१३

२. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१५२/एसडी-६, दि.२१.०६.२०२२

३. या कार्यालयाचे पत्र क्र.०२२१४, दि.२५.१०.२०२३

४. शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.१५२/एसडी-६/भाग-१, दि.०६.०२.२०२४

उपरोक्त विषयानुसार राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना शासनाने शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर २०१३ अन्वये सदर योजना सन २०१२-१३ पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. सदर शासन निर्णयान्वये इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलीसाठी सदर योजना सन २०१३-१४ पासून नियमित राबविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. शासन निर्णय दिनांक २१ जून, २०२२ नुसार सुधारीत शासन निर्णय काढून सदर योजना राबविण्याचे व त्यासाठी जिल्हास्तरी समिती गठीत करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामध्ये संदर्भिय क्र.४ चे शासन शुध्दीपत्रकानुसार सदर योजनेअंर्तत प्रस्ताव निकाल काढण्यासाठी प्रत्येक जिल्हयात खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत,

जिल्हाधिकारी– अध्यक्ष

२. मुख्यकार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) / महापालिका उपआयुक्त– सदस्य

३.पोलिस अधीक्षक/पोलीस उपायुक्त (प्रशासन)– सदस्य

४. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / प्रशासन अधिकारी (शिक्षण)/शिक्षण निरीक्षक- सदस्य

५. जिल्हा आरोग्य अधिकारी/सिव्हिल सर्जन/सक्षम वैद्यकीय अधिकारी– सदस्य

६. शिक्षणाधिकारी (योजना), (सर्व)/ शिक्षण निरीक्षक, (योजना) बृहन्मुंबई– सदस्य सचिव

शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१३ नुसार लाभार्थी निवडीचे निकष :-

विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू: ७५००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव/२ डोळे किंवा १ अवयव व १ डोळा):- ५००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव/१ डोळा) कायम निकामी ३००००/-

अपंगत्वाच्या कारणाबाबतचे सिव्हिल सर्जन यांचे कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र

शासन निर्णय दिनांक २९.०६.२०२२ नुसार लाभार्थी निवडीचे निकष :-

विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू :- १५००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव/२ डोळे किंवा १ अवयव व १ डोळा):-१०००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव/१ डोळा कायम निकामी):- ७५०००/-

विद्यार्थ्यांस अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यासः प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत

जास्त १,००,०००/-

विद्यार्थी आजारी पडून, सर्प देशाने किवा पोहताना मृत्यु झाल्यास १५००००/-

विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास (क्रिडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेता धक्का, विज पडून): प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १,००,०००/-

शस्त्रक्रिये बाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सिकिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ हा लाभार्थ्यां पोहोचविण्याच्या दृष्टीने व सदर योजनेबाबत संपूर्ण राज्यात एकसुत्रि पणा रहावा या करीता योजनेबाबतची लाभार्थ्यांपासून ते संचालनायपर्यंतची करावयाची कार्यवाही/कार्यपध्दती सोबत दिर

विहित नमुन्यात देण्यात येत आहे.

सोबतः- दाव्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमना विवरण पत्र-अ जोडले आहे. सदरचे विवरण पत्र

👉👉शासन निर्णय pdf download 

Leave a Comment