इ.१०वी १२वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत ssc hsc exam extra time 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.१०वी १२वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत ssc hsc exam extra time 

फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत

संदर्भ : १. राज्य मंडळ, पुणे यांचे जा.क्र. रा.मं. परीक्षा-८/७८० दि.१५/०२/२०२३ चे पत्र

२. राज्य मंडळ, पुणे यांचे जा.क्र. रा.मं./परीक्षा-८/३८३ दि.२८/०१/२०२५ चे पत्र

उपरोक्त विषयाचे संदर्भिय पत्रास अनुसरून आपणांस कळविण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेच्या निर्धारीत वेळेनंतर १० मिनिटे वाढवून देण्यात येत आहे. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेसाठी देखील सकाळ सत्रात सकाळी ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी ०३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळी ११.०० वा. पूर्वी व दुपारी ३.०० वा. पूर्वी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिकांचे वितरण होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी,

परीक्षा दालनात ज्या क्रमाने परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल, त्याच क्रमाने परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर लिखित उत्तरपत्रिका परीक्षार्थ्याकडून गोळा करण्याच्या सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना आपणामार्फत देण्यात याव्यात. पेपरच्या निर्धारीत वेळेनंतर शेवटी १० मिनिटे वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात यावा. सोबत परीक्षा कालावधीत द्यावयाचे घंटेचे सुधारीत नियोजन जोडण्यात आलेले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करावी.