प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत शासन निर्णय prasuti leave Gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत शासन निर्णय prasuti leave Gr 

प्रसुती रजेसंदर्भातील तरतुदी महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ७४ मध्ये करण्यात आल्या आहेत. सदर नियमातील नियम ७४ (२) (ए) नुसार कायम सेवेत नसलेल्या तथापि दोन वर्षे किंवा अधिक वर्षे सतत सेवा झालेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांस नियम ७४(१) प्रमाणे प्रसुती रजा अनुज्ञेय आहे तसेच प्रसुती रजेच्या कालावधीत रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन अनुज्ञेय आहे.

सदर नियमातील नियम ७४ (२) (बी) नुसार कायम सेवेत नसलेल्या एक वर्षापेक्षा अधिक परंतु दोन वर्षापेक्षा कमी सतत सेवा झालेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांस नियम ७४(१) प्रमाणे प्रसुती रजा अनुज्ञेय आहे. प्रसुती रजेच्या कालावधीत रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल त्या रकमेच्या निम्मी रक्कम रजा वेतन म्हणून अनुज्ञेय आहे.

एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास प्रसुती रजा कालावधीत प्रसुती रजा अनुज्ञेय होत नाही व कोणत्याही प्रकारचे रजा वेतन अनुज्ञेय नाही. परंतु प्रसुतीच्या कारणास्तव (वैद्यकीय कारणास्तव) तिच्या खाती असलेली अनुज्ञेय रजा / असाधारण रजा घेता येते. त्यामुळे शासन सेवेत भरतीच्या मान्यताप्राप्त माध्यमाने रुजु झालेल्या महिला कर्मचाऱ्यांकरीता पूर्णवेतनी प्रसुती रजा अनुज्ञेय होण्यासाठी सेवा कालावधीची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ७४ (२) (ए) व (बी) मधील किमान

सेवेची अट रदद करण्यात येत असून राज्य शासनाच्या सेवेत भरतीच्या मान्यताप्राप्त माध्यमाने रुजु झालेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास संदर्भाधीन दि. २४.०८.२००९ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार असलेली प्रसुती रजा अनुज्ञेय राहिल व प्रसुती रजेच्या कालावधीत रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल त्याप्रमाणे रजा वेतन अनुज्ञेय राहिल. अशी रजा, रजा खाती खर्ची टाकण्यात येणार नाही. तथापि, दोन वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास सदर प्रसुती रजा व रजा वेतन खालील शर्तीच्या अधीन राहून अनुज्ञेय राहिल:-

१) प्रसुती रजा मंजूर करण्यापुर्वी ६ महिन्यांच्या वेतनाइतक्या रकमेचा बॉन्ड अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याकडून घेण्यात यावा, तद्नंतरच उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे प्रसुती रजा व रजा वेतन अनुज्ञेय करण्यात यावे.

२) अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याने प्रसूती रजा संपवून शासन सेवेत रुजू झाल्यानंतर किमान दोन वर्षे राज्य शासनाची सेवा करणे बंधनकारक राहील. सेवेचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी, प्रसुती रजा कालावधीत / प्रसुती रजेनंतर रुजू न होता / प्रसुती रजा संपवून रुजु झाल्यावर, राज्य शासनाव्यतिरिक्त / राज्याच्या एकत्रित निधीतून वेतनावरील खर्च भागविला जात नाही अशा इतर सेवेत जाण्याकरीता प्रकरणपरत्वे कार्यमुक्त व्हावयाचे झाल्यास / राजीनामा द्यावयाचा झाल्यास अथवा अन्य कारणास्तव राजीनामा द्यावयाचा झाल्यास अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याने घेतलेल्या प्रसुती रजा कालावधीत देय झालेल्या वेतनाइतके वेतन राज्य शासनास अदा केल्यानंतरच अशा शासकीय महिला कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेचा राजीनामा देता येईल किंवा कार्यमुक्त होता येईल.

२. या सुविधेचा लाभ आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहिल.

३. या शासन निर्णयातील तरतुदीपुरते महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील यासबंधीच्या विद्यमान तरतुदी सुधारण्यात आल्या आहेत, असे मानण्यात यावे. उपरोक्त नियमामध्ये रितसर सुधारणा यथावकाश करण्यात येईल.

प्रसूती रजा शासन निर्णय येथे पहा

👉👉pdf download 

Leave a Comment