प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत pm poshan mid day meal madatnis kamkaj
संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र. शापोआ/२०२२/प्र.क्र.१३०/ एसडी-३ दि.१८/१२/२०२३.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज निश्चित करण्याबाबत तसेच, संबंधित स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्याबाबत व गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील कार्यवाही करण्याबाबत संदर्भाधिन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तथापि, सदर शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी शासनास स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनाद्वारे शासनास प्राप्त होत आहेत.
त्यानुषंगाने आपणास पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.
1. प्रस्तुत योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना संदर्भाधिन दि.१८ डिसेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कामकाजा व्यतिरिक्त कोणतेही अन्य काम न देण्याबाबत सर्व शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
॥. स्वयंपाकी तथा मदतनीस यांना शाळा व्यवस्थापन समितीमार्फत परस्पर कामावरुन कमी केले जात असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने संबंधितांच्या कामकाजाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी संदर्भाधिन शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना बाजू मांडण्याची संधी
देण्यात यावी तदृनंतर गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरुन सूचित करण्यात यावे.
iii.स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत संदर्भाधिन दि.१८ डिसेंबर, २०२३ मधील नमूद तरतूदीनुसार कार्यवाही न करणाऱ्यांवर शासनाच्या प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात यावी.