पुरस्कारप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकास तांदूळ चोरताना रंगेहाथ पकडले;शाळेला मिळालेला पुरस्कार रद्द zilha parishad primary school
लोकमत न्यूज नेटवर्क नाचनवेल, पिशोर : कनड तालुक्यातील वाकद येथील पुरस्कार मिळालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह अन्य दोघांना बुधवारी मध्यरात्री शालेय पोषण आहाराच्या तांदळाची वाहनातून चोरी करताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकद येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक अश्फाक शेख कादर हे बुधवारी रात्री ११:०० वाजता एक टेम्पो (एमएच ०३ एएच ३५०८) घेऊन शाळेजवळ आले. त्यानंतर टेम्पोमालक व चालक रमजान अमालखा पठाण व हमाल एजाज शेख बन्नू (दोघेही रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) यांना सोबत घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पौषण आहाराच्या तांदळाच्या ९ गोण्या (वजन अंदाजे ५ क्विंटल ५० किलो) त्यांनी टेम्पोत टाकल्या.
शाळा व्यवस्थापन समितीने घेतली नोंद
ही बाब ग्रा. पं.चे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन
समितीचे सदस्य व ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ धाव घेऊन टेम्पो व मुख्याध्यापकासह तिघांना पकडले. त्यानंतर पिशोर
पोलिसांना माहिती देण्यात आ पोलिस तत्काळ गावात दाखल इन त्यांनी टेम्पो ताब्यात घेऊन सब पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर शा समितीचे अध्यक्ष विष्णू थो सदस्यांनी केंद्रप्रमुखांकडे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्या मागणी केली. त्यानंतर सार्यकर केंद्रप्रमुख भिवसिंग बिलंगे यां फिर्यादीवरून मुख्याध्यापक अल्पा शेख कादर यांच्याविरुद्ध पि पोलिस ठाण्यात गुन्हा दान करण्यात आला. मुख्याध्यापक शेक दीड वर्षानंतर सेवेतून निवृत्त होणार। शिक्षकदिनी मंदिरात भरली शाळा मध्यरात्री मुख्याध्यापकाकडू शाळेतील तांदूळ चोरण्याचा प्रन झाल्याचे लक्षात येताच गुरु सकाळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले. शाळेला कुलूप ठोकले
मुख्याध्यापकावर शिक्षण विभात तत्काळ कारवाई करावी. गुन्हा नोंद होईपर्यंत शाळा उघडू देणार नसल्याबाबत भूमिका घेतली. असे सरपंच चिकटे यांनी सांगितले.
जि.प.पथकाकडून तपासणी
• याबाबत माहिती मिळताच गुरुवारी सकाळीच जिल्हा परिषदेचे शिक्षण अधीक्षक सचिन शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. टी. शिंदे, शेलगावचे केंद्रप्रमुख भीमसिंग बिलंगे, चिंचोलीचे केंद्रप्रमुख कौतिक सपकाळ, नितीन वाघ यांचे पथक ताळेत दाखल झाले.
• पथकाने चौकशी केली. त्यानंतर पोषण आहाराचे रजिस्टर व वतर असलेल्या कपाटाला कुलूप असल्याने सर्व कपाटे सील केली. त्यानंतर त्यांनी याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केला.
शाळेला मिळालेला पुरस्कार रद्द
जि. प.च्या वतीने जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण व उपक्रमशील शाळेचा पुरस्कार वाकद थील साकेला जाहीर झाला होता. परंतु, या शाळेचे मुख्याध्यापक अरफाक लेख कादर वांच्या चोरीचा कारनामा शिक्षक दिनाच्या पूर्वरावीच उघड झाल्यानंतर गुरुवारी सकाळीच या शाळेला मिळालेला पुरस्कार जिल्हा परिषदेने रद्द केला.