“नामदार गोपाळ कृष्ण गोखले” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
पाळ कृष्ण गोखले हे एक महान देशभक्त होते. देशाच्या सेवेत त्यांनी आपलं आयुष्य गोपाळ अर्पण केलं. गांधीजी स्वतःला अभिमानानं गोखल्यांचा शिष्य म्हणत.
गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोथलुक या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे वडील कृष्णराव. राव. ते कागल येथे नोकरीस होते. गोपाळरावांचं प्राथमिक शिक्षण कागलच्या ग्रामीण परिसरात झालं. गोपाळराव केवळ १३ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडलांचं निधन झालं. गोपाळरावांचे थोरले बंधू गोविंदराव यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गोपाळरावांचं शिक्षण पुढे चालू ठेवलं.
१८८१ साली गोपाळराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले. त्यांनी पुढचं शिक्षण राजाराम कॉलेज, कोल्हापूर, डेक्कन कॉलेज, पुणे आणि एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई इथं घेतलं. गणित विषय घेऊन ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.
कॉलेजात असताना हरी नारायण आपटे हे त्यांचे निकटचे मित्र होते. आपण पुढे कोण होणार, हे सांगताना आपटे, ‘मी कादंबरीकार होणार’, असं म्हणत तर गोखले, ‘देशाची सेवा करण्यासाठी मी झटणार’, अशी आपली महत्त्वाकांक्षा सांगत.
पदवी घेतल्यानंतर, गोपाळरावांनी मनात आणलं असतं तर त्यांना भीती सरकारी नोकरी
सहज मिळवता आली असती; परंतु पूर्ण विचारांती त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये
शिक्षकाचा पेशा पत्करला. ही शाळा चिपळूणकर, टिळक, आगरकर यांसारख्या धोर
देशभक्तांनी स्थापन केली होती. लोकजागृतीसाठी त्यांना या शाळेतून आधुनिक शिक्षणाया
प्रसार करायचा होता.
गोखल्यांनी अल्पावधीतच एक उत्तम शिक्षक म्हणून नाव कमावलं, त्यांनी अंकगणिताचं एक सुप्रसिद्ध पुस्तकही लिहिलं.
पुढं फर्गसन कॉलेजात त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. गोखले हे एक निष्णात प्राध्यापक होते. ते आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करून व्याख्यानं देत. त्यामुळं विद्यार्थिवर्गही त्यांच्यावर खूश असे. १९०४ साली गोखले स्वेच्छेनं नोकरीतून निवृत्त झाले. त्यांनी स्वतःला देशकार्याला वाहून घेतलं.
त्या वेळी देशकल्याणाच्या भावनेनं प्रेरित होऊन महाराष्ट्रात अनेक सुधारणावादी चळवळी चालू होत्या. भारतातील आधुनिकतेचे एक शिल्पकार न्यायमूर्ती रानडे, हे या सर्व चळवळींचे सूत्रधार होते.
न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रेरणेनं व प्रोत्साहनानं गोखल्यांनी सार्वजनिक जीवनात भाग घेण्यास सुरुवात केली होती. प्रथम पुणे सार्वजनिक सभा, नंतर डेक्कन सभा आणि नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशा क्रमानं ते देशकार्यात उतरले. गोखले न्यायमूर्ती रानड्यांना आपले गुरू मानत.
पुणे सार्वजनिक सभा ही लोककल्याणासाठी १८७० साली स्थापन झाली होती. गोखले त्या सभेचे चिटणीस झाले. न्यायमूर्ती रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते या सभेच्या त्रैमासिकाचं संपादन करत. सार्वजनिक सभेनं लोकांची स्थिती सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारकडं अनेक विनंतीअर्ज पाठवले.
‘सरकारला तर लोकांची पर्वाच नाही, मग ही विज्ञापने कशासाठी ?’ असा प्रश्न गोखल्यांनी एकदा रानड्यांना विचारला.
न्यायमूर्ती रानडे हसले आणि म्हणाले,
‘या देशाच्या इतिहासात आपले काय स्थान आहे, तुम्हांस ठाऊक नाही. ही विज्ञापने सरकारच्या नावाने लिहिली असली तरी वास्तविक ती लोकांसाठीच आहेत. लोकांनीही या बाबतीत विचार करायला शिकले पाहिजे, नाही का ?’
आपल्या गुरूंना काय म्हणायचं आहे, ते गोखल्यांनी नेमकं ओळखलं. लोकांना शहाणं करून सोडण्याचा त्यांनी निश्चय केला. लोकांचे प्रश्न लोकांना समजावून सांगून त्या प्रश्नांसाठी लढा देण्यास तयार करायचं, अशी त्यांची भूमिका होती.
१८८८ मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी ‘सुधारक’ है साप्ताहिक सुरू केलं. लोकांना सामाजिक व राजकीय प्रश्नांची ओळख करून देण्याचे काम ‘सुधारक’नं हाती घेतलं होतं. या प्रागतिक पत्राच्या इंग्रजी आवृत्तीचं संपादन गोखले करत.
१८८९ पासून गोखले काँग्रेसच्या अधिवेशनांना नियमितपणं उपस्थित राहू लागल थोड्याच अवधीत ते काँग्रेसचे एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेधा यांसारख्या थोर देशभक्तांकडून गोखल्यांना खूप काही शिकायला मिळालं. १९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे गोखले अध्यक्ष झाले.
आज आपण आदर्श म्हणून स्वीकारलेल्या मानवतावादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे गोखले खंदे पुरस्कर्ते होते. कोणत्याही जातिधर्माविषयी वा पंथाविषयी त्यांच्या मनात दुजाभाव नव्हता.
शांततापूर्ण व सनदशीर मार्गानं भारत स्वतंत्र व्हावा, अशी गोखल्यांची इच्छा होती.
‘सनदशीर मार्ग’ म्हणजे काय ?
सनदशीर मार्ग म्हणजे केवळ सरकारकडं विनंती अर्ज किंवा विज्ञापनं पाठवणं एवढंच गोखल्यांना अभिप्रेत नव्हतं. न्याय्य मागणीसाठी हिंसा, बंडखोरी किंवा परकीयांशी हातमिळवणी न करता शांततामय प्रतिकार किंवा करवसुलीस विरोध या मार्गानं आंदोलन करण्यास त्यांची हरकत नव्हती; म्हणूनच दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी जी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली होती, तिला गोखल्यांनी पाठिंबा दिला होता.
भारतातील अन्यायी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी गोखले अनेक
वेळा इंग्लंडला गेले. भारतातील स्वातंत्र्यलढ्याच्या बाजूनं इंग्लंडमध्ये लोकमत तयार करणं, हा त्यांच्या इंग्लंडभेटीचा मुख्य हेतू असे.
भारताच्या आर्थिक कारभाराच्या चौकशीसाठी ‘वेल्वी कमिशन’ नेमण्यात आलं होतं. या कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी १८९७ साली गोखल्यांना खास पाचारण करण्यात आलं.
ब्रिटिश सरकार भारताचं आर्थिक शोषण करून स्वतःची तुंबडी कशी भरत आहे, हे गोखल्यांनी कमिशनसमोर सप्रमाण दाखवून दिलं.
गोखले मुंबई कायदेमंडळात आणि पुढं केंद्रीय कायदेमंडळात निवडून गेले होते. जवळपास १२ वर्ष ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य होते. कायदेमंडळात त्यांनी भारतीयांच्या हक्कांचा सतत पुरस्कार केला आणि ब्रिटिश सरकार करत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. भारताच्या आर्थिक प्रश्नावरील त्यांची भाषणं अत्यंत अभ्यासपूर्ण आणि उद्बोधक असत.
लोकशिक्षण हा गोखल्यांचा अत्यंत आचेचा विषय होता. ब्रिटिश सरकार भारतीय जनतेच्या शिक्षणावर अत्यंत कमी खर्च करतं, हे त्यांनी सरकारला स्पष्ट शांगितलं. मुलाचुलीश प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करावं, अशी त्यांनी सतत मागणी केली.
भारतातील ग्रामीण जनतेचं ‘भयावह दारिश्य’ गोखल्यांना रात्रंदिवस बेचैन करत असे. सरकारच्या डोईजड करआकारणीवर त्यांनी सतत टीका केली. मीठ ही माणसाची प्राथमिक गरज आहे आणि मोकळ्या हवेइतकंच ते त्याला मोफत मिळालं पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. मिठावरील कर कमी व्हावा, म्हणून ते प्रयत्नशील होते.
पुढं गांधीजींनी केलेला दांडी सत्याग्रह ही गोखल्यांच्याच विचारांची परिणती होती.
राष्ट्रोद्धारासाठी निःस्वार्थ, समर्पित वृत्तीनं पूर्ण वेळ काम करणारे कार्यकर्ते हवेत, आरामखुर्चीत लोळणारे राजकारणी नकोत, हे गोखल्यांनी ओळखलं होतं. असे सेवाभावी कार्यकर्ते तयार करण्यासाठी त्यांनी १९०५ मध्ये ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना केली आणि ते स्वतः त्या संस्थेचे पहिले सदस्य झाले. जातीय एकता, दलितोद्धार, स्त्री-शिक्षण, दीनदुबळ्यांची सेवा आणि आपग्रस्तांना साहाय्य हे भारत सेवक समाजाचं उद्दिष्ट होतं. दलित वर्गाविषयी गोखल्यांना अपार सहानुभूती होती. गुलामीचाच एक प्रकार असलेल्या वेठबिगारीविरुद्ध त्यांनी लढा दिला.
सुप्रसिद्ध राष्ट्रवादी नेते श्रीनिवास शास्त्री आणि विख्यात कामगार पुढारी ना. म. जोशी असे अनेक जण भारत सेवक समाजाचे कार्यकर्ते झाले.
१९१४ साली पहिलं महायुद्ध सुरू झालं. या युद्धात इंग्लंडचा पराभव झाला, तर भारत आणखी कोणाच्या तरी जोखडाखाली जाईल, असं काहींचं मत होतं, पण गोखल्यांना हा विचार मान्य नव्हता. भारत स्वसामर्थ्यावर राज्य करू शकतो, असा त्यांचा ठाम विश्वास होता. ब्रिटिश सरकार भारतावर पंचवीस वर्षांहून अधिक काळ राज्य करू शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती.
या आदर्श भारत सेवकानं १९ फेब्रुवारी १९१५ रोजी या जगाचा निरोप घेतला. लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’त लिहिलं,
…. विद्यार्थिदशेपासूनच उदात्त ध्येय डोळ्यांसमोर ठेवले, तर कर्तबगार माणूस कुठवर जाऊन पोचतो, याचा धडा गोपाळरावांच्या जीवनावरून मिळतो. आमच्या तरुण पिढीने हाच पाठ गिरवावा आणि तो ते मनापासून गिरवतील, असा आम्हांस विश्वास वाटतो.’
*