शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरणानुसार अवघड क्षेत्र घोषित करणेसाठी माहिती सादर करणेबाबत online teacher transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरणानुसार अवघड क्षेत्र घोषित करणेसाठी माहिती सादर करणेबाबत online teacher transfer 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण निश्चित केल्याने, जिल्हयातील अवघड क्षेत्र घोषित करणेसाठी माहिती सादर करणेबाबत

संदर्भ :-

१. ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय पिय-२०२३/प्रक्र. ११८/आस्था-१४ दिनांक १८ जून २०२४

२. कार्यासन अधिकारी, ग्रामविकास विभाग यांचेकडील पत्र क्रन्यायाप्र/२०२४/प्रक्र.१०००/आस्था- १४ दिनांक ७ नोव्हेंबर, २०२४

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, जिल्हा परिषदेच्या कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. संदभीय शासन निर्णयाचे कटाक्षाने अवलोकन व्हावे,

संदर्भ क्र. २. अन्वये जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षक संवर्गाच्या बदल्यांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. संदर्भ प्रा. २ मधील मुहा क्र. ३ नुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत,

शासन निर्णयातील परिशिष्ठ १ मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रसिद्ध करावयाची आहे. करिता शासन निर्णयातील परिशिष्ठ १ मधील अवघड क्षेत्राचे निकष अ.क्र. १ ते ७ पैकी ३ बाबींच्या निकषांची पूर्तता होईल अशा आपल्या गटातील (संबंधित सक्षम प्राधिकान्याच्या / विभागाच्या अहवालनुसार शाळांचा गावांचा अवघड क्षेत्राच्या यादीत समावेश करण्यासाठी खाली दिलेल्या विहीत प्रपत्रात Excel Sheet मध्ये ISM मधील DVOT-Surekh (युनिकोड) या फॉन्टमध्ये (याव्यतिरिक्त इतर कोणतेही फॉन्ट उदा. Google Input, Kruti, Shrilipi, Sulipi इ. हे फॉन्ट वापरू नये) दिनांक १/१२/२०२४ रोजी गटशिक्षाणाधिकारी व विषयाचे कामकाज पाहाणारे नोडल अधिकारी यांनी हार्ड व सॉफ्ट कॉपीसह समक्ष सादर करावी.

गटस्तरावर बदली विषयक कामकाज अधिक जलदगतीने अचूक व वस्तुनिष्ठ होण्यासाठी नोडल अधिका-याची नेमणूक करावी व त्यांना सहायक म्हणून कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांची नेमणूक करावी, तसेच तालुका स्तरावर अवघड क्षेत्र निश्चितीच्या निकषांची पडताळणी करून अंतिम करणेसाठी खालीलप्रमाणे पाच सदस्यीय समिती गठीत करावी, सदर समितीने १ ते ७ निकषांच्या पुष्ठवर्ष प्राप्त केलेली सादर करावयाची माहिती पडताळणी करून संयुक्त स्वाक्षरीसह जिल्हा कार्यालयास सादर करावी

जिल्हा कार्यालयास माहिती सादर करताना निकषनिहाय पूरक कागदपत्रांचा संच देण्यात यावा.

उक्त नमूद कालावधीत माहिती सादर करण्याची दक्षता घ्यावी, मुदतीत माहिती न दिल्यास व जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करण्यास विलंय झाल्यास त्याबाबतची जबावदारी संबंधितांवर निश्चित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

सोचत: १. अवघड सर्वसाधारण क्षेत्र नमुना १ व २

२. मुख्य / क्षेत्रीय कार्यलयाकडून माहिती मागवण्याचे नमुने

३. केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांच्या अहवालाचा नमुना

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत परिपत्रक येथे पहा