जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड व सर्वसाधारण क्षेत्र घोषित करणेबाबत online teacher transfer
संदर्भ
– १) ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ दि. १८/०६/२०२४
२) कार्यासन अधिकारी, ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील पत्र क्र. न्यायाप्र/प्र.क्र.१०५/आस्था-१४ दि. ०७/११/२०२४
३) या कार्यालयाकडील पत्र जा. क्र. ठाजिप/शिक्षण/प्राथ/नियो-७/वशी-/१९६१९/२०२४ दि. ०९/१२/२०२४
४) या कार्यालयाकडील पत्र जा. क्र. ठाजिप/शिक्षण/प्राथ/नियो-७/वशी-/३२६ दि. २३/०८/२०२२
५) अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी जिल्हास्तरीय समिती सभा दि. १६/१२/२०२४
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण संदर्भ क्र. १ चे दि. १८/०६/२०२४ रोजीच्या शासन निर्णयानूसार निश्चित करण्यात आले आहे. संदर्भ क्र. २ अन्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक व बदल्यांच्या अनुषंगाने करावयाची पूर्वतयारी याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. संदर्भ क्र. ३ अन्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.
संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-१ मध्ये जिल्हास्तरावर अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच सदर परिशिष्टात जिल्हास्तरावर अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी गठीत समितीने अवघड क्षेत्राचे दर ३ वर्षांनी (मार्च महिन्यात) पुनर्विलोकन करण्यात यावे असे नमूद आहे. संदर्भ क्र. ४ अन्वये जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी यापूर्वी दि. २३/०८/२०२२ अन्वये सर्वसाधारण व अवघड क्षेत्रातील शाळा घोषित केलेली आहे. त्यामुळे सदर यादीस अद्याप ०३ वर्षे पूर्ण न झाल्याने सन २०२४-२५ मधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी दि. २३/०८/२०२२ अन्वये घोषित केलेली सर्वसाधारण व अवघड क्षेत्रातील शाळांची यादीच कायम ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या सन २०२४-२५ साठी अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत शिक्षकांना बदली अधिकार पात्र ठरविताना संदर्भ क्र. ४ अन्वये घोषित अवघड क्षेत्रातील शाळांची यादी ग्राहय धरून याद्या तयार करण्यात याव्यात. तसेच सदरची बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्यात यावी.