जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारीत धोरण निश्चित केल्याने जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणेसाठी माहिती सादर करणे बाबत teacher online transfer process
संदर्भ :
– 1. ग्राम विकास विभागाकडील, शासन निर्णय क्रमांक जिपब-2023/प्र.क्र. 118/आस्था-14 दि. 18 जून, 2024
2. मा. कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. न्यायाप्र-2024/प्र.क्र. 105 /आस्था-14 दि. 07 नोव्हेंबर, 2024
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे संदर्भीय क्र, 01 च्या शासन निर्णयान्वये सुधारीत धोरण निश्चित करण्यात आले आहे. संदर्भीय शासन निर्णयाचे कटाक्षाने अवलोकन व्हावे. संदर्भ क्र.02 अन्वये जिल्हा परिषेतील कार्यरत शिक्षक संवर्गाच्या बदल्यांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. संदर्भ क्र. 02 मधील मुद्दा क्र. 03 नुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.
शासन निर्णयातील परिशिष्ठ 01 मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रसिध्द करावयाची आहे. करीता शासन निर्णयातील परिशिष्ठ । मोल अवघड क्षेत्राचे निकष अ.क्र. 01 ते 07 पैकी 3 बाबींच्या निकषांची पुर्तता होईल अशा आपल्या गटातील (संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याच्या / विभागाच्या अहवालानुसार) शाळांचा / गावांचा अवघड क्षेत्राच्या यादीत समावेश करण्यासाठी खाली दिलेल्या विहीत प्रपत्रात Excel Sheet मध्ये ISM मधील DVOT-Surekh (युनिकोड) या फॉन्टमध्ये (या व्यतिरीक्त इतर कोणतही फॉन्ट उदा. Google Input, Kriti, Mangal इ. हे फॉन्ट वापरु नये) दिनांक 23/12/2024 रोजी गटशिक्षणाधिकारी व विषयाचे कामकाज पाहणारे नोडल अधिकारी यांनी हार्ड व सॉफ्ट कॉपीसह समक्ष सादर करावी,
गटस्तरावर बदली विषयक कामकाज अधिक जलदगतीने अचूक व वस्तुनिष्ठ होण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी व त्यांना सहाय्यक म्हणून कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांची नेमणूक करावी, तसेच, तालुका स्तरावर अवघड क्षेत्र निश्चितीच्या निकषांची पडताळणी करुन अंतिम करणेसाठी खालील प्रमाणे पाच सदस्यीय समिती गठीत करावी. सदर समितीने 01 ते 07 निकषांच्या पुष्ट्रद्धं प्राप्त केलेली / सादर करावयाची माहिती पडताळणी करुन संयुक्त स्वाक्षरीसह जिल्हा कार्यालयास सादर करावी.
1. गटविकास अधिकारी पंचायत समिती- समिती अध्यक्ष
2. उपअभियंता (इ व द) उपविभाग-सदस्य
3. कनिष्ठ प्रशासन अधिकारी (शिक्षण)- सदस्य
4. बदली नोडल अधिकारी (तालुकास्तर) -सदस्य
5. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती-सचिव
जिल्हास्तरावर माहिती सादर करतांना निकषनिहाय पुरक कागदपत्रांचा संच देण्यात यावा. उक्त नमूद कालावधीत माहिती सादर करण्याची दक्षता घ्यावी, मुदतीत माहिती न दिल्यास व जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करण्यास विलंब झाल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
सोबत : 1. अवघड / सर्वसाधारण क्षेत्र नमूना 1 व 2
2. मुख्य / क्षेत्रीय कार्यलयाकडुन माहिती मागवण्याचे नमूने
3. केंद्रप्रमुख / विस्तार अधिकारी यांच्या अहवालाचा नमूना