१०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत old pension scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

१०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत old pension scheme 

दिनांक ०१/११/२००५ पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक ०१/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत तपासणी समितीची बैठक.

संदर्भ : १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. समिती-२०२४/प्र.क्र.५९/टीएनटी-६ दिनांक १३.०८.२०२४

२. तपासणी समितीची दिनांक २०.०८.२०२४ रोजीचे बैठक

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भीय दिनांक १३.०८.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक ०१/११/२००५ पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक ०१/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता आर्थिक भाराबाबत पुनः तपासणी करण्याकरिता आयुक्त, शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली “तपासणी समिती” गठीत करण्यात आलेली आहे. सदर समितीचे आपण सन्माननीय सदस्य आहात.

उपरोक्त समितीच्या दिनांक २०.०८.२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार व चर्चेत ठरल्याप्रमाणे समितीने शासनास सादर करावयाचे अहवालाचे प्रारूप तयार करण्यात आलेले आहे. सदर अहवाल अंतिम करण्याकरिता दिनांक २४.०९.२०२४ रोजी दुपारी दुपारी ४.०० वाजता, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे येथे समक्ष (Offline/Online) बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीची लिंक आपणांस यथावकाश

बैठकीपूर्वी कळविण्यात येईल.

सदर बैठकीस उपस्थित राहणेबाबत विनंती आहे.