शिक्षकांसाठी आंतरजिल्हा प्रक्रिया बदली सुरू करा;प्रहार शिक्षक संघटनेकडून करण्यात आली मागणी teachers’ inter district transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांसाठी आंतरजिल्हा प्रक्रिया बदली सुरू करा;प्रहार शिक्षक संघटनेकडून करण्यात आली मागणी teachers’ inter district transfer 

जालना : राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांकरिता ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदली टप्पा सुरू करावा, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या सोयीसाठी आजपर्यंत आंतरजिल्हा बदलीचे सहा टप्पे यशस्वीपणे राबवले आहेत. यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना ऑनलाइन बदलीमुळे स्वःजिल्ह्यांमध्ये बदली करणे सहज व सोपे झाले होते. याच पद्धतीने राज्यामध्ये स्वःजिल्हा सोडून इतर जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना गंभीर आजार किंवा पती-पत्नी एकत्रीकरण यासह इतर कारणाने स्वःजिल्ह्यामध्ये बदली हवी आहे. असे हजारो शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्यासाठी वाट पाहत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने अशा शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे.

आंतरजिल्हा बदली ही कालबद्ध पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याकरिता बदली पोर्टल सुरू करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू, अमोल तोंडे, संजय हेरकर, वैशाली भिसे, योगेश झांबरे, प्रवीण वाघमोडे, धनंजय कुलकर्णी, युसूफ खेतीवाले, मुकुंद खरात, तायडे आदींनी केली आहे. शिक्षकांच्या मागणीनुसार शासनस्तरावरून होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

आजपर्यंत ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदलीचे सहा टप्पे यशस्वी राबवून हजारो शिक्षकांना स्वःजिल्ह्यामध्ये बदली देऊन दिलासा दिला आहे. त्याच पद्धतीने स्वः जिल्ह्यात जाण्यास इच्छुक शिक्षकांना न्याय देण्यासाठी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी संघटनेची मागणी आहे.

संतोष राजगुरू, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना