प्रलंबीत वैदयकीय प्रतीपुर्ती देयकांची अनुदान मागणी शालार्थ-2.0 प्रणाली अंतर्गत ऑनलाईन सादर करणेबाबत medical bill online deyak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रलंबीत वैदयकीय प्रतीपुर्ती देयकांची अनुदान मागणी शालार्थ-2.0 प्रणाली अंतर्गत ऑनलाईन सादर करणेबाबत medical bill online deyak 

तालुका स्तरावरील मंजूर प्रलंबीत वैदयकीय प्रतीपुर्ती देयकांची अनुदान मागणी शालार्थ-2.0 प्रणाली अंतर्गत ऑनलाईन (CLAIM ENTRY) पद्धतीने जिल्हा कार्यालयास सादर करणे बाबत.

उपरोक्त विषयान्वये शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालय, जि.प.जालना अंतर्गत सर्व DDO2 आणि DDO1 यांना सुचित करण्यात येते की, आपले आधिनस्त मंजूर प्रलंबीत वैदयकीय प्रतीपूर्ती देयकांची ऑनलाईन नोंदणी (CLAIM ENTRY) करुन आवश्यक अनुदान मागणी शालार्थ ऑनलाईन वेतन प्रणाली 2.0 अंतर्गत उपलब्ध असलेल्या MEDICAL BILL सुविधेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावी.

शालेय मुख्याध्यापक-DDOI यांनी आधिनस्त कर्मचा-यांचे मुळ वैद्यकीय प्रतीपुर्ती मंजुरी आदेश आदेशानुसार ऑनलाईन नोंदणी (CLAIM ENTRY) संबंधीत शालार्थ प्रणालीमधील DDO-1 LOGIN मधुन करावी, यावेळी केवळ मुळ आदेश PDF स्वरूपात UPLOAD करावा व ऑनलाईन नोंद केल्याची प्रत व मुळ आदेशाची छायांकीत प्रत पंचायत समिती कार्यालयास सादर करण्यात यावी. उपरोक्त कार्यवाही करण्यास शालेय मुख्याध्यापक-DDO1 यांना अंतिम मुदत दिनांक 18.02.2025 (मंगळवार) रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत राहील यांची नोंद घ्यावी. तथापि, आपले आधिनस्त एकाही कर्मचा-याचे वैद्यकीय प्रतीपुर्ती देयकांची ऑनलाईन CLAIM ENTRY प्रलंबीत राहणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी संबधीत शालेय मुख्याध्यापक-DDO1 यांनी घ्यावी.

तद्नंतर, गटशिक्षणाधिकारी DDO-2 यांनी शालार्थ-2.0 प्रणालीमध्ये मध्ये शालेय मुख्याध्यापक DDO1 यांचेकडून प्राप्त झालेल्या ऑनलाईन MEDICAL BILL देयकांची पडताळणी पंचायत समतीत दाखल HARD COPY देयकांवरुन करुन केवळ अचुक नोंदी व नियमानुसार देय असलेल्याच देयकांची CLAIM ENTRY मागणी जिल्हा स्तरावर ऑनलाईन फॉरवर्ड करावी. उपरोक्त कार्यवाही करतांना आवश्यक ते प्रमाणपत्रे संबधीत शिक्षक/मुख्याध्यापक यांचे कडुन हस्तगत करण्यात यावेत. तसेच प्राप्त सर्व देयकांचे हार्ड कॉपी (ऑनलाईन नोंद केल्याची प्रत व आदेशाची छायांकीत प्रत, पडताळणी प्रमाणपपत्र व देयक विवरण यादी इ. अहवाल) आणि गटशिक्षणाधिकारी-DDO2 यांचे पडताळणी प्रमाणिकरण पत्रासह एकत्रीत मागणी दिनांक 21.02.2025 (शुक्रवार) रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालय जि.प. जालना येथे संबधीत शाखा लिपीकांचे हस्ते सादर करावी.

कुठल्याही परिस्थितीत सदरील कार्यवाहीस मुदतवाढ दिली जाणार नाही तसेच वैदयकीय प्रतीपुर्ती देयकांची अनुदान मागणी ऑफलाईन पद्धतीने स्विाकारण्यात येणार नाही. केवळ शालार्थ-2.0 प्रणाली अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने सादर मागणीनुसारच अनुदान वितरीत करण्यात येईल. वैद्यकीय प्रतीपुर्ती देयकांची शालार्थ प्रणाली अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने मागणी न केल्यामुळे अनुदान प्राप्त न झाल्यास व त्यायोगे संबधीत कर्मचारी त्याचे आर्थीक लाभापासून वंचित राहील्यास सर्वस्वी जाबाबदारी संबधीत DDO1/DDO2 यांची राहील. याबाबत आपले तालुका अंतर्गत कार्यरत सर्व शालेय मुख्याध्यापक-DDO1 / शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि केंद्रप्रमुख यांना आपले स्तरावरून कळविण्यात यावे.

Join Now