मुख्याध्यापक तुम्ही पण; शिक्षकाकडून टक्केवारीने घेतली २७०० रुपये लाच एसीबीने ठोकल्या बेड्या : गेवराईत केली कारवाई headmaster lach prakaran
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : वरिष्ठ श्रेणीचे बिल तयार करून ते बिल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गेवराई व जिल्हा परिषद बीड येथून मंजूर करून देण्यासाठी एकूण बिलापैकी १० टक्के याप्रमाणे २७०० रुपयांची लाच मागणाऱ्या • मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत ■ प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी गेवराई केली. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
भारत शेषेराव येडे (वय ५७, रा. गेवराई) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते गेवराई तालुक्यातील मण्यारवाडी शाळेत मुख्याध्यापक आहेत. तक्रारदार हे याच तालुक्यातील आहेर वाहेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांना चटोपाध्याय / वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ अटी व शर्तीनुसार मान्य केले आहेत. संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी वरिष्ठ श्रेणी देय आहे किंवा कसे असे पत्र काढले होते. त्यावरून तक्रारदार यांचे वरिष्ठ श्रेणीचे बिल तयार करून ते बिल गटशिक्षणाधिकारी पंचायत
समिती गेवराई व जिल्हा परिषद बीड येथून मंजूर करून देण्यासाठी एकूण बिलाची रक्कम २७ हजार रुपयांच्या १० टक्केप्रमाणे २७०० रुपयांची लाच मागितली. याबाबत शिक्षकाने तक्रार करताच एसीबीने सापळा रचून सोमवारी कारवाई केली. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गेवराई ठाण्यात सुरू होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युनूस शेख, गुलाब बाचेवाड, सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश – गवळी, अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेहेत्रे, आदींनी केली.