२०२४ मध्ये पाठविले ३६८ निवृत्तीचे प्रस्ताव; एकासाठी लाखाचा ‘रेट’ शिक्षण विभाग : लिपिकाच्या लाचेत कोणाचा किती ‘वाटा’ pension prastav
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती
वेतन मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यासाठी शिक्षण विभागात पैसे घेतल्याशिवाय फाईल पुढे जात नसल्याचे समोर आले आहे. एका फाईलसाठी १ ते दीड लाख रुपयांचा ‘रेट’ ठेवला होता. त्याप्रमाणे मागील २०२४ या वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल ३६८ प्रस्ताव पाठविले होते. सरासरी पावणे चार कोटी रुपयांची यातून ‘वर कमाई’ झाल्याचा संशय असून यात कोणाचा किती ‘वाटा’ याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग घेणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष कुकडे याने सेवा निवृत्तीचा प्रस्ताव तयार करून महालेखापाल, नागपूर यांना पाठवण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ९० हजार रूपये देण्याचे ठरले. पैकी ४० हजार रुपये आगोदरच घेतले होते तर दुसरा हप्ता ५० हजार रूपये घेताना कुकडे याला बुधवारी दुपारी त्याच्याच कार्यालयात एसीबीने रंगेहाथ पकडले. यावरून निवृत्त झालेल्या शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वेतन देण्यासाठी शिक्षण विभागातील कर्मचारी अडवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी ‘फिक्स रेट’ करण्यात आला होता. त्याची ‘फिल्डिंग’ लावण्यासाठीही जिल्हा परिषदेतच जून काही ‘दलाल’ देखील ठेवले आहेत. त्यांच्यामार्फत सर्व काही ‘नियोजन’ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु या लाचेच्या कारवाईने शिक्षण विभागातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. सामान्य लोकांसह शिक्षकांची कशाप्रकारे आर्थिक लूट होते, याचा प्रत्यय बुधवारी जिल्हावासीयांना आला. आता या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
रजिस्टर जप्त, नावापुढे लाल खूण
■ कारवाईनंतर एसीबीने कुकडे याच्या ताब्यातून २०२४ मध्ये पाठविलेल्या प्रस्तावांची नोंदणी असलेले रजिस्टर जप्त केले आहे.
■ त्यात वर्षभरात ३६८ प्रस्ताव पाठविल्याची नोंद आहे. त्यातील काही नावांपुढे लाल पेनाने ‘राईट’ केलेले आहे.
■ त्यामुळे ही खुण नेमकी कशाची? याचा तपास एसीबी करणार आहे.
विभागप्रमुखही येणार अडचणीत
प्राथमिक कारवाईत जरी एकटा वरिष्ठ लिपिक अडकला असला तरी या प्रकरणात विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे. या लाचेमध्ये कोणाचा किती ‘चाटा’ आणि ‘टक्का’ होता, याचा तपास एसीबी करणार आहे. जर यात सहभाग आढळला नाही तर ‘क्लीन चिट’ आणि आढळला तर कारवाई होणार असे, एसीबीतील सूत्रांनी सांगितले.
तक्रार देण्यास पुढे यावे
२०२४ मध्ये ३६८ प्रस्ताव पाठविले. यामध्ये जर कुकडे किंवा इतर कोणी या नियमातील कामासाठी लाच घेतलेली असेल तर त्यांनी पुढे यावे, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. त्यांचा जबाब आणि पुरावे असतील तर वेगळी तक्रार घेतली जाणार आहे. काही शिक्षकांनी तर कारवाईनंतर फोन करून एसीबीतील अधिकाऱ्यांचे स्वागत केल्याचीही माहिती आहे.
वरिष्ठ लिपिकावर कारवाई करून संबंधित कागदपत्रे व इतर माहिती जप्त केली जात आहे. आता पोलिस कोठडीत त्यांच्याकडून आणखी माहिती समोर येईल. यात जर आणखी कोणाचा सहभाग आढळला तर त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित केली जाईल. नियमानुसार काम असतानाही लाच घेणे चुकीचे आणि गुन्हा आहे. असे कोणी करत २१ असल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाया २० करू. या प्रकरणात चौकशीला १६ कोणाला बोलवायचे हे पोलिस ३४ कोठडीतील तपास झाल्यावर सांगता येईल.
-शंकर शिंदे, उपअधीक्षक, एसीबी