शिक्षकांना मुख्याध्यापक/केद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत ek extra vetanvadh
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत.
संदर्भ :- शासनाचे समक्रमांक दि.२०.०३.२०२४ चे पत्र, दि.१४.०५.२०२४, दि.०९.१०.२०२४ व दि.२२.११.२०२४ चे स्मरणपत्र
महोदय,
उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ दिल्यास येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत प्रपत्रात मागविण्यात आली आहे. तथापि, आपल्या कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अद्यापपर्यंत अप्राप्त आहे.
२. सदर प्रकरणी नमूद करण्यात येते की, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र.११४५२/२०२४ दाखल केली आहे. पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती अप्राप्त असल्याने प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यास विलंब होत आहे.
३. तरी पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम ११ (१) (अ) अन्वये पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्यात आली असल्यास तसा अहवाल सादर करावा अन्यथा आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत विवरणपत्रामध्ये शुक्रवार दि.२९.११.२०२४ पर्यंत शासनास तात्काळ सादर करावी, ही विनंती.