केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीची फाइल तयार, सीईओंच्या मान्यतेकडे लक्ष ! Kendrapramukh headmaster promotion 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीची फाइल तयार, सीईओंच्या मान्यतेकडे लक्ष ! Kendrapramukh headmaster promotion 

सेवानिवृत्तीला आलेल्या केंद्रप्रमुख मुख्याध्यापकांना पदोन्नतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अनेक वर्षांपासून जिल्हा

परिषद शाळांमधील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय प्रलंबित आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शासन निर्णय ७ मे २०२१ मधील निर्देशानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी पदोन्नतीच्या विचार क्षेत्रात येणाऱ्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची अंतिम ज्येष्ठता यादीनुसार पदोन्नतीची फाइल तयार झाली असून, लवकरच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जवळपास २२५ मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना

पदोन्नतीची प्रतीक्षा असून, यातील अनेकजण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीपूर्वी तरी जिल्हा प्रशासनाने आम्हाला पदोन्नती द्यावी. अशी मागणी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनी केली आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षण विभागांतर्गत विस्तार अधिकारी (वर्ग ३), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक (मराठी माध्यम व उर्दू माध्यम) या संवर्गातील अंतिम सेवाज्येष्ठता यादीनुसार व संबंधित पदाकरिता निश्चित केलेल्या अर्हतेनुसार पदोन्नतीची अंतिम ज्येष्ठता यादीनुसार फाइल तयार झाली असून, आता केवळ जि. प.सीईओ बी. वैष्णवी यांच्या मंजुरीच प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर पातूर, मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळ या सातही पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या २२५ मुख्याध्यापक केंद्रप्रमुखांना यंदातरी पदोन्नत मिळण्याची आशा आहे.

अशी मिळणार पदोन्नती

सेवाज्येष्ठता यादीनुसार मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख पदावर, विस्तार अधिकारी पदावर तर केंद्रप्रमुखांना विस्तार अधिकारी पदोन्नती देण्याचा विचार सुरू आहे. याबाबत शिक्षण विभागात पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.

दिव्याग कर्मचाऱ्यांचीही सेवाज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती

शिक्षण विभागातील दिव्यांग शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांचीसुद्धा सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार आहे. संवर्गनिहाय, सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन, सर्वांनाच पदोन्नती देण्यात येणार असल्याची माहिती आहे.