RTE 25% प्रवेश निवड यादी pdf प्रवेश प्रक्रिये संदर्भात मार्गदर्शक सूचना व आवश्यक कागदपत्रे right to education selection list pdf 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE 25% प्रवेश निवड यादी pdf प्रवेश प्रक्रिये संदर्भात मार्गदर्शक सूचना व आवश्यक कागदपत्रे right to education selection list pdf 

RTE अंतर्गत 25% मोफत प्रवेश निकाल लागलेला आहे सदर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी खालील लिंक वर पाहू शकता

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

निवड यादीतील (List No. 1) प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 14/02/2025 पासून 28/02/2025 पर्यंत राहील.

निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी .

अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.

निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.

Join Now