आरटीई २५% निकाल ऑलाईन पहा सर्व प्रक्रिया लाईव्ह पहा मोफत प्रवेश मिळाला किंवा नाही वेबसाईटवर पहा rte mofat pravesh live
RTE अंतर्गत 25% मोफत प्रवेश १० फेब्रुवारी रोजी ऑनलाईन निकाल लागणार असून आपल्या पाल्याचा नंबर लागला किंवा नाही हे आपल्याला SMS व प्रतीक्षा यादी येण्यासाठी कमीत कमी तीन ते चार दिवस लागणार आहे त्यामुळे घाई करू नका. फक्त दोन दिवसांनी खालील दिलेल्या तीन प्रकारे आपण आपल्या पाल्याचा नंबर कोणत्या शाळेमध्ये लागला आहे हे चेक करू शकता.
खालील तीन पद्धतीने ऑनलाईन निकाल पाहू शकता
निकाल पाण्याची पद्धत क्रमांक-1
ऑनलाइन वेबसाईट वर जाऊन अर्जाची स्थिती या टॅब वर क्लिक करुन आपला अर्ज क्रमांक टाकून चेक करा
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
निकाल पाण्याची पद्धत क्रमांक-2
निकाल चेक करण्यासाठी आपण आपल्या आयडी आणि पासवर्ड वापर करून ऍडमिट कार्ड या टॅब वर क्लिक करून आपला नंबर कुठल्या शाळेत लागला आहे हे चेक करू शकता
निकाल पाहण्याची पद्धत क्रमांक-3
आपण ऑनलाईन अर्ज केल्या नंतर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वर आपल्याला एसएमएस प्राप्त होणार आहे जर आपल्याला एसएमएस प्राप्त झाला तर समजावे आपल्या पाल्याचा नंबर लागलेला आहे.
अशा तीन प्रकारे आपण आपल्या पाल्याचा नंबर लागला किंवा नाही असे चेक करू शकता.