“नेताजी सुभाष चंद्र बोस” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
मी अशी पवित्र शपथ घेतो, की हिंदुस्थान आणि अडतीस कोटी प्रजा यांस स्वतंत्र करण्याकरिता मी हे स्वातंत्र्ययुद्ध माझ्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत चालू ठेवीन. भारतभूमीचा सेवक राहून अडतीस कोटी हिंदी बंधुभगिनींचे हित साधणे, हेच माझे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे, असे मी समजेन.’
२१ ऑक्टोबर १९४३ रोजी आझाद हिंद सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेताना सुभाषचंद्र बोस यांनी वरील उद्गार काढले.
२३ जानेवारी १८९७ रोजी एका सधन सुशिक्षित कुटुंबात सुभाषबाबूंचा जन्म झाला. बालपणापासूनच ते एक हुशार विद्यार्थी होते. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते बी.ए. झाले. पुढं इंग्लंडला जाऊन आय.सी.एस. झाले. त्याच वेळी भारतात ब्रिटिशांची दडपशाही सुरू होती. जालियनवाला बाग हत्याकांडाची हकीगत वाचून ते विलक्षण अस्वस्थ झाले. अशा ब्रिटिश साम्राज्यशाहीची चाकरी करणं त्यांना अपमानकारक वाटलं. यापुढं देशसेवेचा खडतर मार्ग त्यांनी स्वीकारला.
भारतात आल्यानंतर सुभाषबाबूंनी चित्तरंजन दास यांचं शिष्यत्व पत्करलं व त्यांच्या दर्शनाखाली देशसेवेचं काम सुरू केलं. चित्तरंजन दास हे प्रख्यात वकील, महान देशभक्त काँग्रेसचे थोर कार्यकर्ते होते. काँग्रेसमध्येच त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापनाहान देशभक्त शातवायूंच्या आज्ञेवरूनच कोलकत्याच्या महाविदयालयाचं प्राचार्यपद सुम्ती होती स्वीकारलं. युवकांच्या मनावर स्वातंत्र्य, स्वदेशी, देशभक्ती यांचे संस्कार केले.
१९२१ मध्ये इंग्लंडच्या युवराजाचं भारतात आगमन झालं. त्या प्रसंगी संपूर्ण हरताळ पाळण्यात आला. सुभाषबाबूंनी या आंदोलनात भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिने हुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. पुढं दहशतवादी क्रांतिकारकांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून सरकारनं काही काळ मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली होती.
गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यचळवळ अधिक लोकाभिमुख बनू लागली. या चळवळीचा विविध अंगांनी विकास होऊ लागला. युवाशक्तीचा वाढता सहभाग हे या विकासाचं एक लक्षण होतं. सुभाषबाबूंनी बंगालमध्ये युवक संघटना उभारली होती.
संपूर्ण स्वातंत्र्य हे काँग्रेसमधील तरुणांचं ध्येय होतं. वसाहतीचं स्वराज्य त्यांना नको होतं. तळागाळातल्या माणसांविषयी या तरुणांना विशेष आस्था होती. सुभाषबाबू आणि जवाहरलाल नेहरू हे दोन नेते या नव्या प्रवाहाचे प्रतिनिधी होते. १९२९ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
सुभाषबाबूंनी वेळोवेळी सत्याग्रहाच्या चळवळीत भाग घेऊन कारावासही भोगला होता; परंतु स्वातंत्र्यप्राप्तीसाठी यापेक्षा जहाल मार्ग स्वीकारला पाहिजे; साम्राज्यविरोधी चळवळ प्रखर केली पाहिजे; क्रांतीला आता पर्याय नाही, प्रसंगी ती क्रांती सशस्त्रही असू शकेल, असं त्यांचं मत झालं.
सरकारविरोधी निदर्शनाबद्दल जानेवारी १९३२ मध्ये सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली. तुरुंगात त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एक वर्षानं मुक्त करण्यात आलं, मात्र उपचारांसाठी त्यांनी भारतात न थांबता युरोपात गेलं पाहिजे, असं बंधन त्यांच्यावर घालण्यात आलं. त्यामुळं सुभाषबाबू युरोपात रवाना झाले. तिथं त्यांनी अनेक ठिकाणी भाषणं देऊन भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न तेथील लोकांना समजावून सांगितला. बंदी हुकूम मोडून १९३६ मध्ये ते भारतात परतले. त्यांना पुन्हा अटक करण्यात आली; परंतु त्याबद्दल देशभर निषेध झाला, म्हणून त्यांना सोडण्यात आलं.
१९३८ च्या हरिपुरा येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची बिनविरोध निवड झाली. १९३९ च्या त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते पुन्हा निवडून आले. त्यांची
लोकप्रियता शिगेला पोचली होती. युरोपात दुसऱ्या महायुद्धाचं वारं वाहू लागलं होतं. या परिस्थितीचा आपण फायदा घ्यावा, ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा अत्यंत तीव्र करावा, संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीकरिता देशव्यापी आंदोलन सुरू करावं, असं त्यांचं मत होतं.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा करावा, त्याकरिता वाटल्यास इंग्लंडच्या शत्रुराष्ट्रांचीही मदत घ्यावी, असं सुभाषबाबूंना वाटू लागलं. त्यांच्या जहाल विचारांमुळं सुभाषबाबूंचं तुरुंगाबाहेर राहणं ब्रिटिश सरकारला अत्यंत धोकादायक वाटत होतं. त्यांना तुरुंगात डांबण्याचं निमित्त सरकारला हवं होतं. ‘स्वातंत्र्याचा क्षण समीप आला आहे’, अशा आशयाचं भाषण सुभाषबाबूंनी केलं आणि सरकारला निमित्त मिळालं. सुभाषबाबूंना अटक करून स्थानबद्ध करण्यात आलं. या अन्याय्य स्थानबद्धतेचा त्यांनी कडक शब्दांत धिक्कार केला. ताबडतोब सुटका न केल्यास आपण आमरण उपोषण करू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. सरकारनं त्यांची तुरुंगातून मुक्तता केली आणि कोलकत्यातील त्यांच्या राहत्या घरीच त्यांना नजरकैद केलं. त्यांच्या घराभोवती सशस्त्र शिपायांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला.
त्यातूनही सुभाषबाबू वेशांतर करून जानेवारी १९४१ मध्ये घरातून निसटले. पेशावरला गेले. पठाणाचा वेश करून झियाउद्दीन हे नाव त्यांनी धारण केलं होतं. अत्यंत खडतर प्रवास करून त्यांनी काबूल गाठलं. तिथं सुमारे दोन महिने काढल्यानंतर ते जर्मनीची राजधानी बर्लिन इथं पोचले.
जर्मनीला पोचताच सुभाषबाबूंनी तेथील हुकुमशहा हिटलर याच्याशी बोलणी केली. भारतीय स्वातंत्र्याकरिता त्याची मदत मागितली. मात्र हे करताना हिटलरचे ते हस्तक बनले नाहीत किंवा फॅसिस्ट विचारसरणीला त्यांनी पाठिंबाही दिला नाही. हिटलरकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
बर्लिनमध्ये सुभाषबाबूंनी ‘स्वतंत्र भारत केंद्र’ नावाची संस्था स्थापन केली. स्वतंत्र रेडिओ केंद्र सुरू केलं. रेडिओवरून भारतीयांना उद्देशून भाषण करताना ते म्हणाले,
‘भारताला स्वतंत्र करणे, हे माझ्या जीवनाचे एकमेव सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. भारत गुलामगिरीच्या बेड्या तोडून मुक्त झालेला पाहावा, हीच माझी इच्छा आहे.’
डिसेंबर १९४१ मध्ये जपान जर्मनीच्या बाजूनं युद्धात उतरला. आता जगाच्या पूर्व भागातही महायुद्ध पोचलं. जपानी फौजांनी अमेरिका, इंग्लंड इत्यादी दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा पराभव करून आपली विजयी घोडदौड सुरू केली. त्यांनी ब्रिटिश फौजांचा पराभव करून सिंगापूर जिंकलं. ब्रिटिश सेनेतील हजारो भारतीय सैनिकांना जपाननं युद्धकैदी म्हणून पकडलं.
विख्यात क्रांतिकारक रासबिहारी बोस जपानमध्ये स्थायिक झाले होते. भारता स्वातंत्र्यासाठी तिथं ‘हिंदी स्वातंत्र्य संघा’ची, तसंच सशस्त्र संघर्षाकरिता ‘आझाद
‘धी त्यांनी स्थापना केली होती. सिंगापुरमध्ये जपाननं युद्धकैदी केलेले भारतीय सैनिक या सेवेत सामील झाले.
हिंदी स्वातंत्र्य संघानं सुभाषबाबूंना पूर्व आशियात बोलावलं व चळवळीचं नेतृत्व जीकारण्याची विनंती केली. जर्मनी ते जपान असा खडतर प्रवास पाणबुडीतून करून सुभाषबाबू सिंगापूरला पोचले. जुलै १९४३ मध्ये पूर्वेकडील स्वातंत्र्यचळवळीचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं. आझाद हिंद सेनेचे ते सरसेनापती बनले. यानंतर ‘नेताजी’ या नावानं सर्वजण त्यांना ओळखू लागले.
ऑक्टोबर १९४३ मध्ये भारताचं हंगामी सरकार, ‘आझाद हिंद सरकार’ स्थापन करण्यात आलं. सुभाषबाबू आझाद हिंद सरकारचे प्रमुख बनले.
आझाद हिंद सेनेचा एक भाग म्हणून सुभाषबाबूंनी ‘राणी ऑफ झाशी रेजिमेंट’ या रावाची महिलांची एक पलटण उभी केली. तिचं नेतृत्व डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडं सोपवण्यात आलं. या पथकासमोर बोलताना नेताजी म्हणाले,
‘हिंदी वीर स्त्रियांची पूर्वापार एक मालिका चालत आली असून त्यांची परंपरा उज्ज्वल आहे. लढण्याचे काम स्त्रियांचे नव्हे, असे कित्येक लोक समजतात, परंतु माझे मत तसे नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त पराक्रम दाखवू शकतात. हिंदुस्थानची सध्याची परिस्थितीच अशी आहे, की स्त्रियांनीसुद्धा पुरुषांच्या बरोबरीने लढले पाहिजे. ज्या स्त्रीचे नाव या पथकास दिले आहे, ती एक विलक्षण पराक्रमी स्त्री होती.’
आझाद हिंद सेना ही धर्मनिरपेक्ष लष्करी संघटना होती. जात, धर्म, प्रांतवार पलटणी करण्याची कल्पना सुभाषबाबूंना मान्य नव्हती. प्रत्येक पलटणीत सर्व धर्म-पंथांच्या लोकांचं मिश्रण होतं. आझाद हिंद सेनेतील प्रत्येक सैनिक प्रशिक्षित होता. राष्ट्रप्रेमानं भारलेला होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट करण्याची व प्रसंगी प्राण देण्याचीही प्रत्येकाची तयारी होती.
आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य होतं ‘विश्वास एकता बलिदान’, युद्धघोषणा होती ‘चलो दिल्ली !’ निशाण होतं चरख्याचं चित्र असलेला तिरंगी झेंडा, आणि बोधचिन्ह होतं झेप घेणारा वाघ. ‘जय हिंद’ हा सेनेच्या मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र होता, तर ‘सब सुख चैन की बरखा बरसे भारत भाग्य है जागा’, हे राष्ट्रगीत होतं. सेनेतील व्यवहाराची भाषा होती हिंदुस्थानी.
या साऱ्यांतून आझाद हिंद सैनिकांची राष्ट्रभक्ती जाणवते.
ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेली अंदमान व निकोबार ही दोन बेटं जपाननं आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. सुभाषबाबूंनी अंदमान बेटावरील पोर्टब्लेअर इथं तिरंगा ध्वज फडकावला. स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी या बेटांवरील कैदेत बलिदान केलं. त्यांच्या स्मरणार्थ अंदमानचं नाव ‘शहीद बेट’ ठेवण्यात आलं. निकोबारचं नाव ‘स्वराज्य बेट’ असं ठेवण्यात आलं.
भारताच्या पूर्व सीमेवरील इंफाळ या प्रमुख शहरावर आझाद हिंद सेनेनं जपानी फौजांसह हल्ला करण्याचं ठरवलं.
मार्च १९४४ मध्ये आझाद हिंद सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला.
इंफाळच्या चढाईत आझाद हिंद सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली, तरी त्यांना इंफाळ जिंकण्यात अपयश आलं.
जपानविरुद्ध दोस्तांचा प्रतिहल्ला सुरू झाला. जपानवरील अमेरिकेचे विमानहल्ले प्रखर झाले. जपानची पीछेहाट सुरू झाली. त्यामुळं भारतीय आघाडीवरील सैन्याला रसद पाठवणं अशक्य झालं. अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर ऑगस्ट, १९४५ मध्ये अणुबाँब टाकले. त्यामुळं जपाननं शरणागती पत्करली. आझाद हिंद सेनेचा मदतीचा आधार तुटला. नेताजींनी प्रयत्नांची शिकस्त केली; परंतु पुरेशा कुमकेअभावी आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. स्वातंत्र्यसंग्रामातील एका धीरोदात्त प्रयत्नाचा शेवट झाला.
१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात नेताजींचा दुर्दैवी अंत झाला.
या श्रेष्ठ स्वातंत्र्यसेनानीची स्मृती मात्र भारतीयांना सदैव स्फूर्ती व प्रेरणा देत राहिली.