जिल्हा परिषदेची अशी शाळा जिथे प्रवेशास लागतात रांगा, निम्मे विद्यार्थी बाहेरगावाहून करतात ये-जा zilha parishad primary school
कमी विद्यार्थी संख्येमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा इतर शाळांमध्ये समायोजित करण्याची संख्या मागील काही वर्षात झपाट्याने वाढती आहे.
बाहेरगाहून येतात मुले
कमी पटसंख्येमुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा तिढा दिवसेंदिवस वाढत असताना जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील भोंगाने दहिफळ येथील जिल्हा परिषदेची शाळा या सर्व नकारात्मक परिस्थितीला अपवाद ठरू पाहत आहे. या शाळेत प्रवेशासाठी वर्षभरापूर्वी पासून नंबर लागावा लागत आहे. शाळेत राबवण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे सदरील शाळा विद्यार्थी व
खाजगी शाळेला लाजवेल अशी सरकारी शाळा
पालकांचे आकर्षण ठरू पाहत आहे. जिल्हा परिषदेच्या दहीफळ भोंगाने पूर्व शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. कधी काळी पाच वर्गात जेमतेम १५ ते २० विद्यार्थी संख्या असणाऱ्या या शाळेत सध्या ५४ विद्यार्थी शिक्षक घेतात. ५४ पैकी ३० विद्यार्थी स्थानिक आहेत तर २४ विद्यार्थी १५ किमी परिसरातून ये- जा करतात. विशेष म्हणजे १ जुलैला शाळेची प्रवेश प्रक्रिया बंद झाली आहे. प्रवेश प्रक्रिया बंद झाल्यापासून पन्नासपेक्षा जास्त पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे तर पुढील वर्षी प्रवेश मिळावा म्हणून अनेकांनी नाव नोंदणी केली. शालेय परिसराचे शालेय व्यवस्थापन समिती आणि लोकसहभागातून सुशोभीकरण करण्यात आले आहे. वर्षाकाठी लाखांच्या घरात शुल्क आकारणाऱ्या
एखाद्या खाजगी शाळेला देखील लाजवेल असा प्रकारे परिसराची सजावट उपलब्ध साहित्यातून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे शाळेतच आरओ प्लांट लावण्यात आला आहे. शालेय परिसरात परसबाग तयार करण्यात आली असून या बागेतील भाजीपाला शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी वापरला जातो.
वाढदिवस साजरा करण्याची अनोखी पद्धत
अनोखी पद्धत शाळेतील मुलांचा अथवा शिक्षकांचा वाढदिवस या शाळेत वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. वाढदिवसाला शालेय परिसरात एक झाड लावले जाते. लावलेले झाड जगविण्याची जबाबदारी संबंधितावर सोपविली जाते. या उपक्रमातून शालेय परिसरात लावलेली झाडे आता मोठी होत आहेत. शालेय परिसर हिरवाईने नटला आहे.
शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा
शालेय स्तरावरच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी शाळेतील शिक्षक विशेष लक्ष देऊन करून घेतात.उन्हाळी सुट्ट्या, दीपावली सुट्ट्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शिकविले जाते. मागील वर्षी शाळेतील अनुजा नांगरे ही विद्यार्थिनी नवोदय प्रवेश पात्र ठरली आहे.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थी स शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. यंदा नि देखील किमान दोन विद्यार्थी नवोदय प्रवेशात पात्र ठरतील असा विश्वास जि.प. शाळेचे शिक्षक विनायक भिसे यांनी व्यक्त केला.
मानसिकता बदलावी समिती अध्यक्ष
• गावातील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण गावातच मिळत असेल तर शाळेसाठी काय हवे ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे. शाळेसाठी कुठल्याही साहित्यांची कमतरता भासू नये यासाठी आम्ही गावकरी कायम दक्ष असतो. पालकांनी आपली मानसिकता आणि दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. – प्रल्हादराव भोंगाने, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती