केवायसीच्या बहाण्याने बँक खाते केले रिकामे ; कुर्ला येथील शिक्षकाची फसवणूक bank account hacked
केवायसी अपडेट करण्याचा बहाना
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली एका शिक्षकाचे बँक खाते रिकामे केल्याचा प्रकार कुर्त्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.
ऑनलाइन व्यवहारापासून सावधान
कुर्ला परिसरात राहणारे तक्रारदार
४९ वर्षीय शिक्षक कुर्त्यातील एका माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत. त्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेच्या सायन आणि चेंबूरमधील शाखेत बैंक खाते आहे. चेंबूर शाखेतील बचत खात्यात त्यांच्या वेतनाची रक्कम जमा होते. २१ ऑगस्टला सकाळी तक्रारदार यांना एका अनोळखी व्यक्तीने कॉल करून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले.
केवायसी करताना खाते रिकामे
त्याने बँक खात्याच्या केवायसीठी आधार कार्ड आणि पॅन कार्डचा फोटो मागून घेतला. आणि एपीके फाईल पाठवत असल्याचे सांगून त्यात माहिती अपडेट करावी; अन्यथा, बँकेतून कोणताही व्यवहार करता येणार नसल्याची भीती घातली. शिक्षकाने बँकेत जाऊन केवायसी फॉर्म अपडेट करणार असल्याचे सांगून कॉल कट केला.
व्हाट्सअप बिजनेस खाते सुरू झाले
अन् व्हॉट्सअॅप बिझनेस खाते सुरु झाले
• त्यांच्या व्हॉट्सअॅपवर त्यांच्या बँकेचे चिन्ह असलेल्या एका मोबाइल नंबरवरून बँक एपीके नावाने एक फाईल आली. शिक्षकाने ती फाईल उघडताच त्या मोबाइल नंबरचे व्हॉट्सअॅप बिझनेस खाते सुरु झाले.
ओटीपी घेऊन खाते गेलेले कामे
• काही समजण्याच्या आतच त्यांना संदेश आणि ओटीपी येण्यास सुरुवात झाली. हे संदेश आणि ओटीपी त्या मोबाइल नंबरवर जात असल्याने त्यांचा गोंधळ उडाला. बँक खाते तपासताच दोन लाख ३५ हजार रुपये खात्यामध्ये वळवून घेतल्याचे समोर आले. त्यांनी तत्काळ नेहरूनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांना पाच वेगवेगळ्या अज्ञात क्रमांकांवरून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला.