YCMOU बी.एड. (सेवांतर्गत) व बी.एड. (विशेष) सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत ycmou online application link
1) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत) व बी.एड. (विशेष) या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत
दिनांक 16.08.2024 ते दिनांक 31.08.2024 पर्यंत (संध्याकाळी 11.59 वाजेपर्यंत)
Ycmou चे अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंक खाली पहा 👇👇👇
https://ycmou.digitaluniversity.ac/Disclaimer.aspx
2) विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.
3) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.
) विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
4 5) प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर (स.10.30 ते सायं. 5.30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील 1/3 शनिवार/रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून) खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
(0253)-2230580, 2230106, 2231714, 2231715, 9307579874, 9307567182, 9272046725
ऑनलाईन प्रवेश २०२४-२५ (ऑनलाईन प्रवेश – विद्यार्थी मदत कक्ष)
Help Desk for Online Admission 2024-25
१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या
दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
साधावा.
२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.
हे ही वाचा
👉👉पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान (FLN) निपुण महाराष्ट्र कार्यक्रम
👉👉सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणेबाबत
👉👉मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-२ नाविन वेळापत्रक
👉👉शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्राथमिक शाळांना जयंती पुण्यतिथी व सुट्ट्यांची यादी
👉👉विद्यांजली पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत रजिस्ट्रेशन लिंक येथे
👉👉“शिक्षण सेवा पंधरवडा अभियान” राबविणेबाबत
👉👉राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-२०२४ राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती सोडविण्यासाठी
आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल.
४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
निरसन त्याद्वारे होऊ शकेल.