अधिवेशानास उपस्थित शिक्षकांना दोन दिवसाची विशेष रजा मंजूर करणेबाबत vishesh rajamanjur
शिक्षक सेनेचे आयोजित अधिवेशानास उपस्थित शिक्षकांना विशेष मंजूर रजा करणेबाबत.
संदर्भ:-
१) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र. १३६/टिएनटि-१, दिनांक १८.०३.२०२०.
२) मा. श्री. ज. मो. अभ्यंकर, विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य यांचे दि.२७.१२.२०२४ चे निवेदन.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. २ येथील मा. श्री. ज.मो. अभ्यंकर, विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य यांच्या निवेदनान्वये शिक्षक सेना या संघटनेच्यावतीने दि.१०.०२.२०२५ व दि.११.०२.२०२५ रोजी दोन दिवसीय वार्षिक शैक्षणिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या वार्षिक शैक्षणिक अधिवेशनास उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांना १० व ११ फेब्रुवारी, २०२५ या दिवसांची विशेष रजा मंजूर करावी, अशी शासनास विनंती करण्यात आली आहे. त्यानुषंगाने प्राप्त निर्देशानुसार आपणास कळविण्यात येते की, शिक्षक सेना या संघटनेच्यावतीने दि.१०.०२.२०२५ व दि.११.०२.२०२५ रोजी आयोजित वार्षिक शैक्षणिक अधिवेशनास उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांना स्वखर्चाने उपस्थित राहण्याच्या तसेच सदर अधिवेशनास उपस्थित राहिल्याबाबतचे उपस्थिती पत्रक सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून दिनांक १०.०२.२०२५ या १ दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार पूढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.