असुधारित वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्याबाबत vetanshreni sudharna
असुधारित वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्याच्या दरात दि. १ जुलै, २०१५ पासून सुधारणा करण्याबाबत.
शासन निर्णय महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००९ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्याऱ्यांना दिनांक १ जानेवारी, २००६ पासून सुधारित वेतनसंरचना लागू करण्यात आली आहे. तथापि जे राज्य शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता अनुज्ञेय असणारे इतर सर्व पात्र पूर्णकालिक कर्मचारी अद्यापही असुधारित वेतनश्रेणीत (पाचच्या वेतन आयोगानुसार वेतन घेत आहेत, त्यांच्या महागाई मत्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होत्ता.
२. शासन असे आदेश देत आहे की, जे राज्य शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता अनुज्ञेय असणारे इतर सर्व पात्र पूर्णकालिक कर्मचारी अद्यापही असुधारित वेतनश्रेणीत वेतन घेत आहेत, त्यांच्या असुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन अधिक महागाई वेतन यावरील अनुज्ञेय महागाई मत्याचा दर १ जुलै, २०१५ पासून २२३% वरून २३४% करण्यात यावा. दि. १ फेब्रुवारी, २०१६ पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात यावी. दि.१ जुलै, २०१५ ते दि.३१ जानेवारी, २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीच्या आहरणाबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे वापुढे लागू राहील.
४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याऱ्यांचे वेतन व भते ज्या लेखाशीर्षांखाली खची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षांखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा, अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षांखालील ज्या उप लेखाशीर्षांखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षांखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
शासन निर्णय क्रमांका ममवा- १११५/प्र.क्र.५/सेवा-१
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०३१८१५२७४९४८०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने.