सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक या पोर्टलवरती शाळांची माहिती अंतिम करणेबाबत udise plus portal
सन २०२४-२५ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती यु-डायस प्रणालीमध्ये ऑनलाईन काम शाळास्तरावर माहे आगस्ट, २०२४ पासून सुरू आहे. दि. ०१/०४/२०२५ पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने सर्व शाळांची अचूक माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर भरून अंतिम करणे आवश्यक आहे. याबाबत केंद्र शासनाकडून दि. २०/०३/२०२५ पर्यंत राज्यातील सर्व शाळांची माहिती अंतिम करून प्रमाणीत करण्यासाठी कळविले आहे. याच माहितीच्या आधारे सन २०२४-२५ PGI, वार्षिक नियोजन अंदाजपत्रकासाठी माहिती वापरण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्व शाळांची अचूक माहिती तपासून अंतिम करण्यासाठी आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्हा व तालुका स्तरावरून सन २०२४-२५ ची माहिती दि. २५/०३/२०२५ पर्यंत अंतिम करून प्रमाणपत्राची प्रत या कार्यालयास ई-मेलद्वारे व यु-डायस प्लस पोर्टलवर अपलोड करण्यात यावी.