इ.२री ते १२वी विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदतवाढ udise plus registration mudatvadh 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.२री ते १२वी विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदतवाढ udise plus registration mudatvadh 

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी करण्यासाठी दि. १४/०२/२०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देणेबाबत.

संदर्भ : जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार.

सन २०२४-२५ या वर्षांमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्याचे सर्व काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी करण्यासाठी दि. १०/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी झाली नसल्याचे दिसून आले आहे. या कार्यालयास ई-मेल व दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मुदतवाढ मिळण्यासाठी विनंती करण्यात येत आहे.

यासंदर्भात आपणास कळविण्यात येत, की यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २ री ते इयत्ता १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने दि. १४/०२/२०२५ पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ घेण्यात आली आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ नोंदणी करण्यासाठी कळविण्यात यावे. यानंतर केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देता येणार

नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा, जबाबदारी सर्वस्वी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

युडायस प्लस क्रमांक प्राप्त नसलेल्या शाळा आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असतील तर तात्काळ विद्यार्थी पटसंख्येसह अहवाल या कार्यालयास दि. १४/०२/२०२५ पर्यंत सादर करावा.

Join Now