यु-डायस प्लस प्रणालीमध्ये आधार नसलेल्या मुलांची नोंद करण्याची सुविधा जिल्हा लॉगीवर उपलब्ध करून देणेसाठी विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी उपलब्ध करून देणेबाबत udise plus aadhar updation
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
३) शिक्षण निरीक्षक – उत्तर, दक्षिण व पश्चिम, मुंबई.
४) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व.
ज्या विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक दिलेला नाही त्यांची माहिती अपडेट करणे बाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४-२५/566
दिनांक: २४ फेब्रुवारी २०२५
विषयः यु-डायस प्लस प्रणालीमध्ये आधार नसलेल्या मुलांची नोंद करण्याची सुविधा जिल्हा लॉगीवर उपलब्ध करून देणेसाठी विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी उपलब्ध करून देणेबाबत.
सन २०२४-२५ या वर्षामध्ये शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची नोंदी पूर्ण करून घेण्याकरिता यु-डायस प्लस प्रणालीमध्ये आधार नसलेल्या मुलांची नोंद करण्याची सुविधा जिल्हा लॉगीवर उपलब्ध करून देणेसाठी आधार नसलेले विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी सोबत दिलेल्या नमून्याप्रमाणे या कार्यालयास दि. २५/०२/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी. सर्व जिल्ह्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनास यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विनंती करण्यात येईल.
खालील तक्त्यानुसार माहिती संकलित करणे
➡️अ.क्र.
➡️यु-डायस क्रमांक
➡️शाळेचे नाव
➡️विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव वय
➡️लिंग
➡️वर्ग
➡️आधार नसल्याचे कारण
(सरोज जगताप) सहा. संचालक (कार्यक्रम) म.प्रा.शि.प., मुंबई.