टीईटी घोटाळ्यातील ५ शिक्षण सेवकांची सेवासमाप्ती; परीक्षेतील गुणापेक्षा प्रमाणपत्रावर जास्त गुण tet fraud terminate teachers’
सो लापूर : ‘टीईटी’ परीक्षेच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून प्राथमिक शिक्षण विभागाकडील पाच शिक्षण सेवकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.
२०१८ व २०१९ मध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाला. शिक्षणसेवक पद मिळविण्यासाठी परीक्षेत प्रत्यक्ष मिळालेल्या गुणांऐवजी अधिक गुण दर्शविण्यात आले. या प्रकरणी पुणे शहर सायबर पोलिस ठाण्यात सात हजार ८७४ उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच शिक्षण आयुक्तांच्या १४ ऑक्टोबर २०२२ व ३ ऑगस्ट २०२३ च्या आदेशानुसार या गैरप्रकारातील उमेदवारांची परीक्षेतील संपादणूक रद्द केली आहे. तसेच त्यापुढील काळात घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घातली आहे. तरीही या पाच शिक्षण सेवकांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ७ मार्च २०१४ रोजी कागपत्रे पडताळणीसाठी बोलावल्यावर हजेरी लावली. तसेच तपासणीवेळी आपण कोणत्याही गैरप्रकारात सहभागी नसल्याचे आणि दिलेली कागदपत्रे खरी असल्याचे स्वयंघोषणापत्र दिले. ती चुकीची आढळल्यास कारवाईस पात्र असल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले.
जिल्हा परिषदेने त्यांना २६ जुलै २०२४ रोजी शिक्षण सेवकपदी नियुक्तीचा आदेश दिला. जिल्हा परिषदेने केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत पुण्याच्या सायबर पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयितांत या पाच शिक्षणसेवकांचा समावेश असल्याचे उघड
झाले. त्यानंतर त्यांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करुन शिक्षण सेवकपदी नियुक्ती मिळविल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी त्यांच्यावर सेवामुक्तीची कारवाई केली आहे.
दोन दिवसांपूर्वी काढला आदेश
शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळातील सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांनी बनावट व खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली होती. त्यांचे विरुद्ध टीईटी २०१९ परीक्षा घोटाळ्याचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीनंतर मुख्य कार्यकारी अधिकरी कुलदीप जंगम यांनी त्या पाच शिक्षण सेवकावर सेवामुक्तीची कारवाई केल्याचा आदेश दोन दिवसांपूर्वी काढला आहे.
फौजदारी कारवाईवर प्रशासनाचे मौन
या पाचही शिक्षण सेवकांनी जिल्हा परिषदेला खोटी व बनावट कागदपत्रे सादर करुन शिक्षण सेवकपदी नियुक्ती मिळविल्याचे तपासणीत उघड झाले आहे. शिवाय टीईटी गैरप्रकारप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यांची सेवासमाप्ती केली आहे. मात्र, याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार का, या
प्रश्नावर शिक्षण प्रशासनाने मौन बाळगले.
‘या’ शिक्षण सेवकांवर कारवाई नाव शाळेचे नाव परीक्षेतील गुण प्रमाणपत्रावर गुण
दिलीप भोये काळेवाडी, ता. सांगोला ७४ -८६ कांतीलाल बहीराम गावडे गायकरवस्ती, ता. सांगोला ६०- ८४ परशुराम वाकडे कोळेकरवाडी, ता. सांगोला ६०- ८७प्रियदर्शिनी भिसे पेहे, ता. पंढरपूर ६२ -८६ उर्मिला गंभीरे भिवरवाडी, ता. करमाळा ५७ -८७
वाचा:- १) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व किडा विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. सीईटी २०१५/प्र.क्र.१४९/टिएनटी-१ दिनांक ७ फेब्रुवारी २०१९
२) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचेकडील शासन निर्णय के. संकिर्ण २०२३/प्र.क्र.१४७/टिएनटी १ दिनांक २१ जुन २०२३-
३) महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ मधील नियम ३ अन्वये,
४) महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ४ मधील नियमान्वये
५) मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील पत्र जांक. आस्था-क/प्राथ-१०६/ पदभरती २०२४/१४०९ दिनांक २५.०२.२०२४ अन्वये शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची निवड यावी.
६) मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे-०४ यांचेकडील गोपनिय पत्र जांश, मरार्पप/बापवि/२०२४ १५३७ दिनांक २२.०३.२०२४.
७) या कार्यालयाकडील पत्र जांक, जिपसी शिक्षण्ण/प्राथ/१४/२५ दिनांक १०.०१.२०२५.
८) पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडील पत्र जांक्र सायबर पोस्टे. पुणे शहर
१७९८/२०२५ दिनांक १४.०२.२०२५.
९) कार्यालयीन मंजुर टिपणी दिनांक ५४०३/२०२५-
जा.क्र./जिपसो/शिक्षण (प्राय) /प्राशिनि/ ४३२५
दिनांक: १०/०३/२०२५
आदेश
उपरोक्त संदर्भ क्रमांक १८२ मधील शासन निर्णयातील मार्गदर्शक सुधनानुसार मा. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील पवित्र संगणकिय प्रणालीव्दारे प्राप्त शिक्षणसेवक निवड यादीतील उमेदयारामध्ये तुमया समावेश असुन संदर्भिय पत्रामध्ये नमूद सार्गदर्शक सुबना व अटी शर्ती नुसार दिनांक ७०३.२०२४ रोजी आपणास कागदपत्रे पडताळीसाठी तपस्थित राहणेबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या व सदर दिवशी आपण उपस्थीत होता सदर कागदपत्रे तपासणी दरम्यान आपण कोणतेही गैरप्रकारामध्ये समाविष्ठ नाही व दिलेले कागदपत्रे ही सत्य असुन यामध्ये कोणतीही कागदपत्रे चुकीचे अगर बोगस आवळलेस आम्ही शास्तीस पात्र आहे याचावत स्वयंचोषणापत्र आपण स्वतः स्वाक्षरीने दिलेले आहे. राजेव समुपदेशादरम्यानही याबाबत सक्त सुचना देण्यात आलेले असतानाही आपण सादर केलेली कागदपत्रे यांच अवलोकन करता आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा (TET) २०१८ व २०१९ मधील गैरप्रकारामध्ये नींद असलेले अफ्र ५६/२०२१ ५ ५८/२०२१ अन्वये सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा नोंद असलेले ७८४, उमेदवारामध्ये आपाला समावेश असुन सदर बाबत पडताळणी केली असता संदर्भ क्रमांक ८ चे पत्रान्वये या कार्यालयास अवगत केलेले आहे. रयानुसार मा. आयुक्त (शिक्षण) यांचेकडील दिनांक १४.१०.२०२२ व ०३.०८.२०२३ चे आदेशान्वये गैरप्रकारातील विददाषयांबी सदर परिक्षेतील संपादणूक रदद करुन यापुढे घेण्यात येणा-या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरुपी प्रतिबंधीत केलेल असताना प सदर बाब ही आपणास ज्ञात असताना आपण जाणून बुजुन या कार्यालयास (CTET) प्रमामापत्र सादर करून या कार्यालयाची दिशाभूल, फसवणुक केलेचे प्रथमदर्शनि निर्देशनाना आलेले आहे, तरोध कागदपत्रे तपासणी दरम्यान आपण सादर केलेले स्वंयः साक्षांकनासाठी स्वयंघोषणापत्र प्रमाणपत्रा मध्ये चुकीची व दिशामुल करणारी माहिती सादर केलेली आहेत, याबाबत आपणास परिपुर्ण माहिती असताना सदरची बाब उधक न करता चुकीची कागदपत्रे कार्यालयास सादर करून समुपदेशनाने नियुक्ती आदेश मिळवलेले आहेत. ही बाब गंभीर आहे.
तसेच आपणास दिनांक २६.०७.२४ रोजी दिलेले नियुक्ती आदेशामधील अंक १ ते २७ मधील नमूद अटी व शर्ती स्पष्टपणे नमुद असताना व आपणास याची जाणीव असताना याबाबत आपण कार्यालयास अवगत केलेल नाही संदर्भक्रमांक ७ अन्याये वाबाचत आपण (TET) गैरप्रकार सन २०१८ व २०१९ मधील गैरप्रकारामध्ये समाविष्ठ एकुण ७८७४. उमेदवारावरती सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे अनुक्रमे गु.र.न.५६/२०२५ ५ ५८/२०२१ अन्वये गुन्हा दाखाल उमेदवारामधी आपला समावेश असलेबाबत संदर्भ क्र.८ अन्वये पोलीस निरीक्षक पुणे शहर यानी आपले पत्रामध्ये नमुद केलेले आहे. त्याबाबत सविस्तर तपशिल त्यानी चालीप्रमाणे नमूद केलेला आहे.