शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणनाबाबत मार्गदर्शन मिळणेबाबत teacher intra district transfer guidelines 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणनाबाबत मार्गदर्शन मिळणेबाबत teacher intra district transfer guidelines 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना संदर्भकरताना येत असलेल्या अडचणीविषयी मार्गदर्शन मिळणेबाबत.

– १) ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. निपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ दि. १८/०६/२०२४

२) कार्यासन अधिकारी, ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील पत्र क्र. न्यायाार/प्र.क्र.१०५/आस्था-१४

दि. ०७/११/२०२४

३) उपसचिव, ग्रामविकास विभाग यांचेकडील पत्र क्रमांक जिपब २०२२/प्र.क्र २९/आस्था-१४ दि. २३/०३/२०२२ नुसार दि. १७/०३/२०२२ च्या VC चे इतिवृत्त

महोदय, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण संदर्भ क्र. १ चे दि. १८/०६/२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. संदर्भ क्र. २ अन्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक व बदल्यांच्या अनुषंगाने करावयाची पूर्वतयारी याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानूसार ठाणे जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदलीपात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयातील मुददा क्र. १.७ मधील अधिकार प्राप्त शिक्षक व त्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवेची करावयाची गणना तसेच संदर्भ क्र. ३ मधील मुददा क्र. ७ नुसार अवघड भागातील शाळेतील सेवा कालावधी गणण्याबाबत प्राप्त निर्देश पुढीलप्रमाणे आहेत

अ) शासन निर्णयातील मुदवा क्र. १.७.२ मध्ये अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणा-या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा ३ वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राहय धरण्यात येईल.

) संदर्भ क्र. ३ मधील इतिवृत्तातील मुददा क्र. ७ अवघड भागातील शाळेतील सेवा कालावधी गणण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्देश आहेत -ब यापूर्वी अवघड क्षेत्रात असलेल्या शाळा, आता सुधारित अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीतून वगळण्यात आल्या असल्या तरी तेथे सुधारणेपूर्वी कार्यरत असलेल्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सेवा केलेली असल्याने विशेष बाब म्हणून केवळ २०२२-२३ च्या बदल्यांमध्ये अवघड शाळांमध्ये सेवा केल्याबद्दल त्यांचा विचार करण्यात यावा.

ठाणे जिल्हा परिषदेमार्फत अवघड क्षेत्राची यादी यापूर्वी दि. २३/०८/२०२२ रोजी घोषित करण्यात आली होती. सदर यादीनंतर सुधारित यादी प्रसिध्द केली तर यापूर्वीची दि. २३/०८/२०२२ ची व सुधारित या दोन्ही यादीतोल अवघड क्षेत्रातील शाळांवरील सेवेचा लाभबदली अधिकार प्राप्त शिक्षक ठरविताना देता येईल. मात्र सन २०२२-२३ च्या बदल्यांमध्ये सन २०२२ पूर्वी घोषित अवघड क्षेत्राच्या यादोचा लाभ देऊन बदली अधिकार प्राप्त शिक्षक निश्चित करण्यात आले होते. मात्र सन २०२२ पूर्वीच्या अवघड क्षेत्राच्या यादीचा लाभअवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करण्यासाठी द्यायचा किंवा नाही याचा कोणताही स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात नाही. त्यामुळे बदलो अधिकार प्राप्त व बदलीपात्र शिक्षक ठरविताना पुढीलप्रमाणे अडचणी निर्माण होत आहे-

१) सन २०१९ च्या अवपड यादीप्रमाणे सन २०२२-२३ मध्ये अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक :

सन २०२२-२३ मध्ये मुददा क्र. २ मध्ये नमूद केल्यानुसार सन २०२२ पूर्वीच्या अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना ०३ वर्षे सेवा पूर्ण झाल्याने बदली अधिकार प्राप्त ठरवून सदर शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रात बदल्या झाल्या आहेत. मात्र त्या यादीतील काही शाळा सन २०२२ मध्ये प्रसिध्द केलेल्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांची सन २०१९ ते सन २०२२ पर्यंतची सेवा अवघड क्षेत्रातील म्हणून ग्राहय धरावी किंवा सन २०२२ च्या यादीत हया शाळांचा समावेश सर्वसाधारण क्षेत्रात समावेश झाल्याने सन २०११ ते २०२५ पर्यंतची सलग सेवा सर्वसाधारण क्षेत्रात ग्राहय धरावी याबाबत संदिग्धता निर्माण होत आहे. उदाहरणार्थ,

एक शिक्षक सन २००९ ते २०१९ पर्यंत सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेवर कार्यरत होता. सन २०१९ मध्ये सदर शिक्षकाची बदलीपात्र म्हणून अवघड क्षेत्रातील शाळेवर बदली झाली. सन २०२३ मध्ये सदर शिक्षक बदली अधिकार प्राप्त ठरून त्याची बदली सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेवर झाली आहे. मात्र सन २०१९ मध्ये ज्या अवघड क्षेत्रातील शाळेवर सदर शिक्षकाची बदली

होऊन त्याने सन २०१९ ते २०२२ या तीन वर्षाची सेवा पूर्ण केली ती शाळा सन २०२२ च्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समाविष्ट झाली आहे. अशावेळी सन २०२२ पूर्वीच्या अवघड क्षेत्र यादीचा लाभ विशेष बाब म्हणून केवळ २०२२-२३ च्या बदल्यांमध्ये अवघड शाळांमध्ये सेवा केल्याबद्दल विचार करावयाचा असल्याने सदर शिक्षकाची ची सन २००९ ते २०२५ पर्यंतची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात गणना करावयाचो की सन २००९ ते २०१९ (सर्वसाधारण क्षेत्र), सन २०१९ ते २०२२ (अवघड क्षेत्र) व सन २०२२ ते २०२५ (सर्वसाधारण क्षेत्र) अशी गणना करावयाची याबाबत संदिग्धता आहे.

२) सन २०१९ च्या अवघड पादीप्रमाणे सन २०२२-२३ मध्ये बदली अधिकार प्राप्त ठरूनही बदली न झालेले शिक्षक : याशिवाय सन २०१९ मध्ये अवघड क्षेत्रातील शाळेवर चदली झालेल्या शिक्षकाने सन २०२२-२३ मध्ये बदलो अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून विनंती अर्ज करूनही त्या शिक्षकाची बदली झाली नसेल अशा शिक्षकास दि. १७/०३/२०२२ च्या इतिवृत्तातील मुददा क्र. ७ नुसार विशेष बाब म्हणून लाभ मिळाला नाही. मात्र सन २०१९ मध्ये अवघड क्षेत्रात असणारी सदर शाळा सन २०२२ च्या सुधारित यादीत सर्वसाधारण क्षेत्र यादीत समाविष्ट झाल्याने संबंधित शिक्षकाची सन २०१९ ते २०२५ पर्यंतची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात गणना करावयाची की सन २०१९ ते २०२२ (अवघड क्षेत्र) व सन २०२२ ते २०२५ (सर्वसाधारण क्षेत्र) अशी गणना करावयाची याबाबत संदिग्धता आहे.

अशा शिक्षकांची सन २०२२-२३ मध्ये अवघड क्षेत्रातून विनंतीने बदली न झाल्याने काही शिक्षकांनी मा. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका क्र. ९४९५/२०२३ हनुमंत साकलावे वि. महाराष्ट्र शासन दाखल केली आहे. सदर याचिकेचा निर्णय उसाप प्रलंबित आहे. मात्र या याचिकेच्या दि. २२/०१/२०२४ च्या सुनावणीत मा. उच्च न्यायालयाने पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत-

2. In spite of the detailed order, no reply is filed. The learned AGP states that in spite of communicating the same to the State Government no instructions are received to file reply. That be the position while we grant further time to the State by way of indulgence to file reply affidavit, it is further directed that if any transfer of teachers from the difficult areas where the Petitioners are working are to be made such transfers would be made strictly on the basis of seniority amongst the teachers.

३) सन २०१९ मध्ये सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक :

शासन निर्णय दि. १८/०६/२०२४ मधील मुददा क्र. १.१० नूसार बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलोसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक.

सन २०१९ मध्ये सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेला शिक्षक बदलीपूर्वी हो १० वर्षे सर्वसाधारण क्षेत्रात कार्यरत होता. त्यामुळे सन २०१९ मध्ये बदली होऊनही सर्वसाधारण क्षेत्रात सलग १० वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण होत असल्याने व सन २०१९ च्या बदलीनंतर एका शाळेवर ०५ वर्षे पूर्ण होत असल्याने असे शिक्षक बदलीच्या ०५ वर्षातच पुन्हा बदलीपात्र ठरत आहेत.

४) यापूर्वी बदलीपात्र किंवा बदली अधिकार प्राप्त म्हणून बदली झालेल्या शिक्षकांना ०३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विशेष संवर्ग भाग १ किंवा विशेष संवर्ग भाग २ चा लाभ घेऊन बदलीच्या संधी बाबत :

शासन निर्णय दि. १८/०६/२०२४ मधील मुददा क्र. ४.२.७ व ४.३.६ नूसार विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही असे नमूद आहे. मात्र काही शिक्षकांची यापूर्वी बदलीपात्र किंवा बदली अधिकार प्राप्त म्हणून सन २०२२-२३ मध्ये बदली झालेली आहे मात्र त्यांना एका शाळेत ०३ वर्षे पूर्ण नाहीत. अशा शिक्षकांची विशेष संवर्ग भाग १ किंवा विशेष संवर्ग भाग २ चा लाभ घेऊन बदली न झाल्याने ते या संवर्गाचा लाभ घेऊन यापूर्वीच्या बदलीनंतर ०३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच बदलीसाठी विनंती करू शकतील का? याबाबत मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

तरी प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी आवश्यक बदली अधिकार प्राप्त शिक्षक व बदलीपात्र शिक्षक याद्या तयार करणे सोईचे होण्यासाठी वरील मुददा क्र. १ व २ प्रमाणे अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एकाच क्षेत्रात सलग सेवा असल्याने बदलीनंतर २५ वर्षात पुन्हा बदलीपात्र होणारे शिक्षक यांच्याबाबत तसेच मुददा क्र. ४ बाबत आवश्यक ते मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

Join Now