शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या SGSP या वेतन खात्याशी संलग्न अपघात विमा योजनेबाबत अवगत करणे State Government Salary Package account
शासकीय/निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या “State Government Salary Package” (SGSP) या वेतन खात्याशी संलग्न अपघात विमा योजनेबाबत अवगत करणे
महोदय/महोदया,
शासकीय/निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन बैंक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विषयक लाभ आधारीत योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत. काही बँकांकडून वित्त विभागाकडे शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची वैयक्तिक वेतन खाती उघडण्यास मान्यता देण्यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत शासन कोणतेही निर्देश देऊ शकत नाही. तथापि वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत. त्याकरीता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त State Government Salary Package (SGSP) अंतर्गत अपघात विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी / कर्मचारी यांना अवगत करणे योग्य वाटते. आवश्यक माहिती अभावी शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अशा योजनांपासून वंचित राहू नये अशी यामागे भूमिका आहे.
सदर पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये वित्त विभागास राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त प्रस्ताव व त्याअंतर्गत “State Government Salary Package” (SGSP) या अपघात विमा योजनेचे विविध लाभ यांची माहिती दर्शविलेली आहे.
प्रशासकीय विभागांनी सदरची माहिती विभागाच्या अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांना अवगत करावी. तथापि अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबतचा निर्णय कर्मचाऱ्याने वैयक्तिकरित्या घ्यावयाचा आहे.
अधिकारी / कर्मचारी यांना उपरोक्त योजनेबाबत काही शंका उद्भवल्यास त्यांनी संबंधित बँकांच्या स्थानिक शाखेकडे अथवा बँकेच्या मुख्यालयाकडे संपर्क साधावा. सदर प्रकरणी कोणतीही चौकशी अथवा पत्रव्यवहार वित्त विभागाकडे करु नये.
SGSP खात्यासंबंधी शासन निर्णय येथे पहा