महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम state badli viniyaman adhiniyam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम state badli viniyaman adhiniyam

सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००६ यात सुधारणा करण्यासाठी विधेयक.

सन २००६ चा २१.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनासाठी, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन महाराष्ट्र आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००६ यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या शहात्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:-

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २१, २०२५/फाल्गुन ३०, शके १९४६

१. (१) या अधिनियमास महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) अधिनियम, २०२५ असे म्हणावे.

संक्षिप्त नाव व प्रारंभ

(२) तो ताबडतोब अंमलात येईल.

सन २००६ चा महा. अधिनियम क्रमांक २१ यांच्या कलम ३ ची

२. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ याच्या कलम ३ मधील पोट-कलम (१) च्या दुसऱ्या ५ “अशा कर्मचाऱ्याला तीन वर्षपिक्षा अधिक कालावधीसाठी त्याच पदावर ठेवण्यात येणार नाही. आणि सुधारणा. लागोपाठच्या दोन पदावधीपेक्षा अधिक पदावधीसाठी त्याला त्याच विभागात ठेवण्यात येणार नाही” या

मजकुराऐवजी “अशा कर्मचाऱ्याने धारण केलेल्या पदावरून कार्यक्षमता, तत्परता व सचोटी या आधाराशिवाय, (त्या पदावरून किंवा त्या विभागातून) बदली करण्यात येणार नाही” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २१, २०२५/फाल्गुन ३०, शके १९४६

उद्देश व कारणे यांचे निवेदन.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००६ अंतर्गत प्रकरण दोन मध्ये कलम ३ (१) मधील दुसऱ्या परंतुकात सेक्रेटरिएट सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या चाबतीत नेमणुकीच्या पदावधीचा कालावधी नमूद केलेला आहे. परंतु सेक्रेटरिएट सेवेतील कर्मचारी हे साधारणतः स्मरण कृती (मेमरी फॅक्शन) नुसार काम करतात. परिणामतः कर्मचाऱ्याच्या कार्यात तत्परता व गती दिसून येत होती. परंतु एका विभागातून दुसऱ्या विभागात कर्मचाऱ्याच्या केवळ त्या विभागातील पदावधीच्या कालावधीनुसार झालेल्या बदलीमुळे संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर व काम करावयाच्या गतीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यामुळे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर किंवा एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करताना पदावधीच्या कालावधीची मर्यादा गैरवाजवी असून उक्त अधिनियमाचा हेतू व उद्देश यास बाधक असल्यामुळे उक्त मयदिऐवजी कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेच्या आधारावर बदली करण्याचे विहित केल्यास ते नियमास अनुरुप होईल असे वाटते.

वरील उद्दिष्ट साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.

Join Now