श्री गणपती निरोप आरती “जाहलें भजन आम्ही नमितों चरणा” shri ganpati nirop arti sangraha
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा
वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ।। धृ।।
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों।देवा तुजलाची ध्यातों ।
प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों ।। १ ।।
तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना।देवा हेची वासना ।
रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ।। २ ।।
मागणें तें देवा आतां एकची आहे। आतां एकची आहे ।
तरुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहें ।। ३ ।।
जेव्हां सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया। ऐशा या ठाया ।
प्रेमानंदें लागू तुझी कीर्ती गावया ।। ४।।
सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनीं। आमुच्या मनीं ।
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ।। ५।।
वारुनियां संकटें आतां आमुर्ची सारी। आतां आमुची सारी ।
कृपेची साउली देवा दीनावरि करीं ।। ६ ।।
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी।
चिंता तुम्हा असावी सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ।। ७ ।।
निरोप घेतों आतां आम्हां आज्ञा असावी ।
चुकलें आमुचें कांहीं त्याची क्षमा असावी ।।