श्री विठ्ठल आरती “येई हो विठ्ठले माझे माऊली ये” shri vitthal arti sangraha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री विठ्ठल आरती “येई हो विठ्ठले माझे माऊली ये” shri vitthal arti sangraha 

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।

निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ।। धृ ।।

आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।

पंढरपूरी आहे माझा मायबाप् ।। १ ।।

पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।

गरुडांवरि बैसोनि माझा कैवारी आला ।। २ ।।

विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।

विष्णुदास नामा जीवेभावे ओंवाळी ।। ३ ।।

संत नामदेव

आरती संग्रह उपलब्ध डाउनलोड करून घ्या Click here