शिवजयंती निमित्त जबरदस्त चारोळ्या shivjayanti charolya 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिवजयंती निमित्त जबरदस्त चारोळ्या shivjayanti charolya 

शिवरायांचे आठवावे रूप ।

शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचा आठवावा साक्षेप ।

भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।।

सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग । राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।।

याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।

या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।।

शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें ।

इहलोकी परलोकीं उरावे । कीर्तीरूपें ।।५।।

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।

सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा ।

बोटे छाटली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा ।।

किती आले किती गेले केले मुघलांना हद्दपार ।

राजे जाहले बहु धरतीवरती ना कुणा शिवबांची सर ।।

अशी करारी नजर सदा गनिमा भेदुनी पाही आरपार ।

शिवरायांमुळेच जाहले स्वप्न स्वराज्याचे साकार ।।

सदा गायी तुझे गुणगान असा माझ्या पोटी वंश दे।

फक्त तुझ्याच.. फक्त तुझ्याच.. शिवशौर्याचा तू अंश दे ।।

शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची किर्ती ।

राजा शोभूनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती ।।

अंगी संचारीता शौर्य थरथरा कापे क्रौर्य ।

जणू कडाडती वीज भासे तेज शिवशौर्य ।।

न्यायदानाची जयांची असे त-हाच निराळी ।

लेणे सौभाग्याचे शाबूत असे शिवशौर्यामुळे भाळी ।।

मायमाऊलीच्या स्त्रीत्वाचा शिवबांनी केला सदैव सन्मान ।

यमसदनी धाडुनी सैतानांना राखीली स्वराज्याची शान ।।

न काळवेळ तयांना लागे शत्रू धारातीर्थी पाडाया ।

स्मरता शिवरायांचे शौर्य लागे आजही इतिहास घडाया ।।

डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच आजही वाजतोय जगती ।

राखीले स्वराज्य अबाधीत असे हे एकमेव शिवछत्रपती ।।

राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान ।

जगती तुम्हीच छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान ।।